ETV Bharat / state

संजय राठोड यांच्यावर कारवाईसाठी सिंधुदुर्गात भाजपा महिला आघाडीचा रास्तारोको - Sanjay Rathore latest marathi news

वनमंत्री संजय राठोड यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, यासाठी पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांच्याविरोधात सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपा महिला आघाडीच्यावतीने आज निदर्शने करण्यात आली.

सिंधुदुर्ग भाजपा
सिंधुदुर्ग भाजपा
author img

By

Published : Feb 27, 2021, 3:16 PM IST

Updated : Feb 27, 2021, 3:24 PM IST

सिंधुदुर्ग - वनमंत्री संजय राठोड यांच्याविरोधात सिंधुदुर्ग भाजपा महिला आघाडी आक्रमक झाली आहे. कुडाळ भाजपा कार्यालयासमोरील चौकात महिला आघाडीच्यावतीने रास्तारोको करण्यात आला. यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्या महिलांना ताब्यात घेतले.

जोरदार घोषणाबाजी

वनमंत्री संजय राठोड यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, यासाठी पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांच्याविरोधात सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपा महिला आघाडीच्यावतीने आज निदर्शने करण्यात आली. कुडाळ भाजपा कार्यालयासमोर रास्तारोको करण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, वनमंत्री संजय राठोड यांच्याविरोधात भाजपा महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. या महिला पदाधिकाऱ्यांनी यावेळी राठोड यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.

पोलिसांनी आंदोलनकर्त्या महिलांना घेतले ताब्यात

महिला जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे यांच्या नेतृत्वाखाली रास्तारोको आंदोलन करण्यात आले. संजय राठोड आणि उद्धव ठाकरे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्या महिलांना ताब्यात घेतले. राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.

'...तर पाच हजार महिला रस्त्यावर उतरतील'

राठोड यांच्यावर कारवाई करू शकत नसाल तर मुख्यमंत्र्यांनी स्वतः राजीनामा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. आठ दिवसात कारवाई झाली नाही, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाच हजार महिला रस्त्यावर उतरतील, असा इशारा यावेळी देण्यात आला.

Last Updated : Feb 27, 2021, 3:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.