ETV Bharat / state

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, तिघांचा मृत्यू तर एक गंभीर

दोन्ही मोटार सायकलींची समोरासमोर धडक झाल्याने दुचाकीवरील चौघेही जण महामार्गावर फेकले गेले. यातील तिघांच्या डोक्याला मोठी दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

accident on mumbai-goa highway
मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात
author img

By

Published : Sep 5, 2020, 10:33 PM IST

सिंधुदुर्ग - जिल्ह्यातील मुंबई-गोवा महामार्गावर कणकवली तालुक्यातील जाणवली कृष्णनगरीसमोर भीषण अपघात झाला. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. हा अपघात दोन मोटरसायकलांमध्ये झाला. मृतांमध्ये दोन तरुण हे रत्नागिरी पाचलमधील आणि कोल्हापूर येथील एका तरुणाचा समावेश आहे. तर एक तरुण गंभीर आहे. त्याच्यावर पडवे येथील लाईफ टाईम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

दोन्ही मोटार सायकलींची समोरासमोर धडक झाल्याने दुचाकीवरील चौघेही जण महामार्गावर फेकले गेले. यातील तिघांच्या डोक्याला मोठी दुखापत झाली. अपघातग्रस्त असलेल्या या चौघांना पडवे येथील लाईफ टाईम हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथे यातील तिघांचा मृत्यू झाला. तर कोल्हापूर येथील एकाची प्रकृती गंभीर आहे.

अपघाताच्या ठिकाणी या जखमी तरुणांच्या रक्ताचा सडा पडला होता. तर महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनांची रंग लागली होती. कणकवली पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत जखमींना रुग्णालयात पाठवले तर अपघातग्रस्त वाहने बाजूला करत मार्ग वाहतुकीला खुला केला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.