सिंधुदुर्ग - गोवा राज्यात सध्या कोरोनाने थैमान घातले असून ऑक्सिजनचाही मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. आक्सिजन अभावी रुग्ण दगावण्याचे प्रमाण वाढत आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी केंद्र सरकारने गोव्याला 323 कॉन्संट्रेटर्स दिले आहेत. कोरोनाविरुद्धच्या लढाईत गोव्याला मदत करण्यासाठी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या पुढाकाराने भारतीय वायूसेनेची दोन विमाने ऑक्सिजन कॉन्संट्रेटर्स आणि अन्य वैद्यकीय साहित्यासह आज गोव्यात दाखल झाली.
ऑक्सिजन कॉन्संट्रेटर्स घेऊन वायू दलाची विमाने दाखल वायूसेनेची दोन विमानांनी गोव्यात साहित्य दाखल
गोव्यातील वाढते कोरोनाबाधित आणि दिवसेंदिवस वैद्यकीय यंत्रणेवरील वाढता ताण या गोष्टींचे गांभीर्य लक्षात घेऊन गोवा सरकारने केंद्राकडे मदत मागितली होती. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी त्यादृष्टीने लागलीच पावले उचलली आणि वायूसेनेची दोन विमाने 323 ऑक्सिजन कॉन्संट्रेटर्स व अन्य वैद्यकीय उपकरणांसह गोव्यात पोहोचली. ऑक्सिजन अभावी रुग्ण मरत असताना गोव्यासाठी केंद्राची ही मदत महत्वाची ठरणार आहे.
ऑक्सिजन कॉन्संट्रेटर्स घेऊन वायू दलाची विमाने दाखल ऑक्सिजनची टंचाई सरकारची डोकेदुखी-यासंदर्भात बोलताना केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक म्हणाले, की गोव्यासह सर्वच राज्यात महामारीचे मोठे संकट आले आहे. त्यातच गोवा वैद्यकीय महाविद्यालयात ऑक्सिजनच्या तुडवण्याने रुग्ण मरण्याचे प्रमाण वाढले. त्यामुळे ऑक्सिजनची टंचाई सरकारची डोकेदुखी झाली आहे. दिवसेंदिवस ऑक्सिजनची गरज वाढत आहे. राज्यांच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी केंद्र सरकार सर्वप्रकारचे प्रयत्न करत आहे. त्यासाठी भारतीय वायू सेनेनेदेखील कोरोनाविरुद्धच्या लढ्यात स्वतःला पूर्णपणे झोकून दिले असून त्यांचे मदतकार्य जोरात सुरू आहे. दोस्त राष्ट्रांनी पुरवलेल्या ऑक्सिजनसह इतर वैद्यकीय सामुग्री भारतात आणण्यात नौदल देखील मोलाची कामगिरी बजावत आहे.
ऑक्सिजन कॉन्संट्रेटर्स घेऊन वायू दलाची विमाने दाखल गोव्यात लवकरात लवकर ऑक्सिजन जनरेटिंग प्लांटगोव्यात लवकरात लवकर ऑक्सिजन जनरेटिंग प्लांट व्हावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. राज्य सरकारने वेळीच त्यांची गरज कळवावी. ती पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी सांगितले. राज्यातील कोरोना महामारी आटोक्यात आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या सर्व सहकार्याबद्दल श्रीपाद नाईक यांनी त्यांचे आभार मानले आहेत.