ETV Bharat / state

बाबो! जिवंत युवकाला आला त्याचा कोरोनाने मृत्यू झाल्याचा फोन, त्याच्या आईला म्हणाले, 'तुमचा मुलगा गेला'

author img

By

Published : Jun 8, 2021, 6:56 PM IST

Updated : Jun 8, 2021, 9:16 PM IST

कोरोनावर उपचार घेऊन पूर्ण बरा झालेल्या फलटणमधील युवकाला त्याचा कोरोनाने मृत्यू झाल्याचा फोन आल्याने युवकासह कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे.

phaltan
मुलगा आणि त्याची आई

सातारा - कोरोनावर उपचार घेऊन पूर्ण बरा झालेल्या युवकाला त्याचा कोरोनाने मृत्यू झाल्याचा फोन आल्याने युवकासह कुटुंबीयांचे धाबे दणाणले आहेत. एखादा हिंदी चित्रपटाच्या कथानकाला साजेसी ही सत्यघटना फलटण शहरात घडली आहे. फलटण शहरातील मंगळवार पेठेत राहणारा सिद्धांत मिलिंद भोसले (वय २०) असे या युवकाचे नाव आहे. गेल्या महिन्यात त्याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. त्याने खासगी रुग्णालयात उपचारही घेतले. गेल्या महिन्याभरापासून तो ठणठणीत आहे.

प्रतिनिधींनी घेतलेला आढावा

हेही वाचा - जगभरातील मीडिया वेबसाईट्स काही काळासाठी बंद

  • काय आहे प्रकरण?

सोमवारी(7 जून) सिद्धांत घरीच असताना त्याचा मोबाईल खणखणला. फोन त्यानेच घेतला. पलिकडील महिला कर्मचाऱ्याने सिद्धांतचे कोविडने निधन झाल्याची बातमी कळवली. हे ऐकूण सिद्धांतला काही सुचेना. त्याने 'हे बघ काय सांगताहेत' असे म्हणत आई सपना भोसले यांना फोन दिला. त्यांनाही तोच निरोप देण्यात आला. आपला मुलगा समोर असताना हे काय अभद्र निरोप देत आहेत, असे म्हणत त्याच्या आईने थेट सरकारी रुग्णालय गाठले. त्यानंतर तेथील कर्मचा-यांनी आम्हाला आलेल्या यादीप्रमाणे निरोप देण्याचे काम केले आहे, असे सांगत आरोग्य कर्मचाऱ्यांनी हात वर केले. कालपासून भोसले कुटुंब चक्रावलेवल्या अवस्थेत आहे. जिवंत मुलाला मृत घोषित करण्याच्या या प्रकारामुळे भोसले कुटुंबीयांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या सर्व प्रकाराची चौकशी व्हावी, अशी मागणी सिद्धांतच्या आईने 'ईटीव्ही भारत'शी बोलताना केली.

हेही वाचा - राज्याने केंद्रासोबत चर्चा सुरू केली याचा आनंदच; फडणवीस यांची मोदी-ठाकरे भेटीनंतर प्रतिक्रिया

  • 'गौडबंगालचा पर्दाफाश करावा'
    satara
    मृतांच्या यादीत सिद्धांतचे नाव

साताऱ्यातील आरटीआय कार्यकर्ते महारुद्र तिकुंडे यांनी या प्रकारावर प्रकाश टाकला. 'ईटीव्ही भारत'शी बोलताना ते म्हणाले, जिवंत व्यक्तीला मृत घोषित करून सातारा जिल्हा आरोग्य यंत्रणेने मोठा धक्का दिला आहे. आजपर्यंत साडेतीन हजारांहून अधिक लोकांचे कोरोनाने मृत्यू झाले आहेत. हे आकडे तरी बरोबर आहेत का? की हे आकडेही फुगवलेले आहेत. यामागे नेमकं काय गौडबंगाल आहे? याचा जिल्हा प्रशासनांने पर्दाफाश करावा, अशी मागणीही तिकुंडे यांनी केली.

  • यादीप्रमाणे कार्यवाही -

मृत व्यक्तीचे नाव असणारी यादी आम्हांला साताऱयातून आली. यादीत नाव आणि माहिती दिसल्यामुळे आमच्याकडून संबंधितांना फोन गेला. यामध्ये नेमकं काय झालं याबाबत वरिष्ठांना कळवण्यात येईल, असे फलटणच्या नागरी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी शितल सोनवलकर यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना स्पष्ट केले.

Last Updated : Jun 8, 2021, 9:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.