ETV Bharat / state

Satara Crime : धक्कादायक! सातार्‍यातील महिला कॉन्स्टेबलच्या पतीची आत्महत्या, कॉन्स्टेबल बहिणींसह आई-वडिलांवर गुन्हा दाखल

महिला कॉन्स्टेबलच्या पतीने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी म्हसवड आणि फलटण पोलीस ठाण्यात कार्यरत असणार्‍या कॉन्स्टेबल बहिणींसह त्यांच्या आई-वडीलांवर म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

author img

By

Published : Mar 12, 2023, 6:01 PM IST

Satara Crime
सातारा क्राईम

सातारा : माण तालुक्यातील म्हसवड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला कॉन्स्टेबलच्या पतीने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. नवनाथ मारूती दडस, असे आत्महत्या केलेल्या तरूणाचं नाव आहे. त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी म्हसवड आणि फलटण पोलीस ठाण्यात कार्यरत असणार्‍या कॉन्स्टेबल बहिणींसह त्यांच्या आई-वडीलांवर म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा करण्यात आला आहे. या घटनेने सातारा जिल्हा पोलीस दलात खळबळ माजली आहे.

बहिणीच्या फिर्यादीवरून चौघांवर गुन्हा : आत्महत्या केलेल्या नवनाथ दडस याची बहिण शांताबाई हिराचंद वलेकर (वय 35, रा. कोथळे, ता. माळशिरस) यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून शिल्पा नवनाथ दडस (कॉन्स्टेबल, म्हसवड पोलीस स्टेशन), तिची बहीण अनिता लाला गाडेकर (कॉन्स्टेबल, फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन), त्यांचे वडील लाला नागू गाडेकर आणि आई सीताबाई लाला गाडेकर सर्व रा. गाडेकरवस्ती, भाटकी, ता. माण यांच्यावर म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

संशयितांकडून वारंवार धमक्या : नवनाथ दडस हा कोथळे, ता. माळशिरस येथे शेती करत होता. पत्नी शिल्पासह तो म्हसवड पोलीस लाईनमध्ये रहात होता. ऑक्टोबर 2022 ते 25 फेब्रुवारी 2023 या कालावधीत म्हसवड तसेच गाडेकरवस्ती भाटकी येथे संशयितांनी नवनाथ यास वारंवार धमक्या दिल्या. या धमक्यांना कंटाळून नवनाथ याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी कॉन्स्टेबल बहिणींसह आई-वडिलांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सातारा पोलीस दलात खळबळ : उपअधीक्षक डॉ. नीलेश देशमुख यांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. दहिवडीचे सहायक पोलीस निरीक्षक अक्षय सोनावणे हे या गुन्ह्याचा तपास करत आहेत. दरम्यान, गेल्याच महिन्यात सातार्‍यातील व्यावसायिक पतीचा सुपारी देऊन खून केल्याप्रकरणी सातारा पोलीस दलातील महिला पोलिसाला अटक झाली होती. आता पतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी कॉन्स्टेबल पत्नीसह तिच्या कॉन्स्टेबल असलेल्या बहिणीवर गुन्हा दाखल झाल्याने सातारा पोलीस दलात हा चर्चेचा विषय ठरला आहे.

हेही वाचा : Five Peoples Found Dead: दुर्दैवी, एकाच कुटुंबातील पाच जणांचा संशयास्पद मृत्यू, पोलिसांनी केला दावा, 'यामुळे' गेला जीव

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.