ETV Bharat / state

खंडाळा तालुक्यात वीज पडून महिलेचा मृत्यू - death due to lightning strike in khandala satara

ज्योती कृष्णात चव्हाण (वय ३३) असे मृत महिलेचे नाव आहे. शेतामध्ये जनावरे आणण्यासाठी गेल्या असताना बुधवारी सायंकाळी ४:३० वाजण्याच्या सुमारास वीज पडुन त्या जागीच ठार झाल्या आहेत.

मृत ज्योती कृष्णात चव्हाण
author img

By

Published : Oct 10, 2019, 12:18 PM IST

सातारा - खंडाळा तालुक्यातील भादे येथील तळे शिवारात वीज पडून एका महिलेचा मृत्यू झाला आहे. ज्योती कृष्णात चव्हाण (वय ३३) असे मृत महिलेचे नाव आहे. शेतामध्ये जनावरे आणण्यासाठी गेल्या असताना बुधवारी सायंकाळी ४:३० वाजण्याच्या सुमारास वीज पडून त्या जागीच ठार झाल्या आहेत.

हेही वाचा - अंगावर वीज पडून शाळकरी विद्यार्थ्याचा मृत्यू, नांदळज बौद्धवाडीतील घटना

कृष्णात चव्हाण यांची भादे गावच्या हद्दीतील तळे शिवारात शेती आहे. त्यांच्या पत्नी ज्योती या शेतामध्ये नेलेली जनावरे आणण्यासाठी गेल्या असता, त्यांच्यावर वीज पडली. या घटनेनंतर नागरिकांनी तातडीने त्यांना उपचारासाठी लोणंद येथील खासगी दवाखान्यात दाखल केले. पण, डॉक्टरांनी मृत घोषीत केले. मृतदेहाचे विच्छेदन करुन त्यांचा मृतदेह नातेवाईकाच्या ताब्यात अंत्यविधीसाठी देण्यात आला आहे.

Intro:सातारा भादे (ता.खंडाळा) येथील ज्योती कृष्णात चव्हाण (वय ३३) या ताठेवस्ती येथील खुरीतील तळे नावाच्या शिवारात शेतामध्ये जनावरे आणण्यासाठी गेल्या असताना बुधवारी सायंकाळी ४:३० वाजण्याच्या सुमारास वीज पडुन जागीच ठार झाल्या आहेत.

Body:याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली आधिक माहिती अशी की भादे ता. खंडाळा येथील कृष्णात चव्हाण यांचे भादे गावच्या हद्दीत ताठेवस्ती येथील खुरीतील तळे नावाच्या शिवारात शेत आहे,त्यांची शेतामध्ये नेलेली जनावरे आणण्यासाठी त्यांच्या पत्नी गेल्या असताना ज्योती कृष्णात चव्हाण वय ३३ या शेतात गेल्या असताना बुधवारी सायंकाळी ४:३० वाजण्याच्या सुमारास वीज पडुन त्या जागीच ठार झाल्या आहेत. या घटनेनंतर नागरिकांनी तातडीने त्यांना उपचारासाठी लोणंद येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते पण डॉक्टरानी त्यांचा मृत्यु झाला असल्याचे सांगितले, त्यांच्या मृतदेहाचे लोणंद प्राथमिक आरोग्य केंद्रामधे शवविच्छेदन करुन त्यांचा मृतदेह नातेवाईकाच्या ताब्यात अंत्यविधीसाठी देण्यात आला आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.