कराड (सातारा) - खासदार राजीव सातव यांच्या निधनाने युवक काँग्रेस मार्गदर्शकाला मुकली आहे, अशा शब्दांत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे यांनी सातव यांना श्रद्धांजली वाहिली. राजीव सातव यांच्या निधनाची बातमी देशभरातील युवक काँग्रेस कार्यकर्त्यांना सुन्न करणारी आहे, असेही मोरे म्हणाले.
काँग्रेस पक्षाची आणि युवकांची मोठी हानी
एप्रिल महिन्यात आसामच्या निवडणूक प्रचारानंतर मुंबईला परत येत असताना राजीव सातव यांच्याशी मुंबई विमानतळावर झालेली भेट अखेरची ठरली. युवक काँग्रेसचे अध्यक्ष असताना त्यांनी काँग्रेसची ध्येय-धोरणं समजावून सांगण्यासाठी घेतलेली शिबिरे युवकांसाठी मार्गदर्शक ठरली. मोठ्या पदांवर असतानाही त्यांनी सर्वसामान्य लोकांशी असलेली नाळ कधीही तुटू दिली नाही. त्यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाची आणि युवकांची मोठी हानी झाली आहे. राजीव सातव यांच्या रुपाने महाराष्ट्राने उमदे नेतृत्व हरवले असून काँग्रेस पक्षाची झालेली हानी कधीही भरून येणार नाही, अशा शब्दांत शिवराज मोरे यांनी सातव यांना श्रध्दांजली वाहिली.
हेही वाचा-विरोधी पक्षनेत्यांप्रमाणे मी वैफल्यग्रस्त नाही - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे