ETV Bharat / state

Five Police Suspended : गृहमंत्री जिल्ह्यात असताना दरोडेखोर लॉकअपमधून पळाले.. ५ पोलिसांचे निलंबन

author img

By

Published : May 13, 2022, 7:04 AM IST

९ मे रोजी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील ( HM Dilip Walse Patil ) हे सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना औंध पोलीस ठाण्याच्या ( Aundh Police Station ) लॉकअपमधून पाच दरोडेखोर पळून गेले ( robbers escaped from the lockup ) होते. या प्रकरणी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल ( IPS Ajaykumar Bansal ) यांनी कारवाई करत पाच पोलिसांना निलंबित केले ( 5 policemen suspended in satara ) आहे.

सातारा : औंध पोलिस ठाण्यातील लाॅकअपमधून पाच दरोडेखोर पळून गेल्याप्रकरणी ( robbers escaped from the lockup ) औंध पोलिस ठाण्याचे ( Aundh Police Station ) सहायक निरीक्षक प्रशांत बदे यांच्यासह इतर चार पोलिस कर्मचाऱ्यांना पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल ( IPS Ajaykumar Bansal ) यांनी गुरुवारी निलंबित ( 5 policemen suspended in satara ) केले. एकाचवेळी पाचजणांना निलंबित करण्याची जिल्हा पोलिस दलातील ही पहिलीच वेळ आहे.

गृहमंत्री जिल्ह्यात असताना घटना : सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत बदे, ठाणे अंमलदार संतोष कोळी, हवालदार कुंडलिक कटरे, शिवानंद नारायणी आणि अंकुश गलांडे अशी निलंबित केलेल्यांची नावे आहेत. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील हे ( HM Dilip Walse Patil ) सोमवार, दि. ९ रोजी सातारा जिल्ह्याच्या दाैऱ्यावर असतानाच औंध पोलिस ठाण्यातून पाच दरोडेखोर पळून गेले होते. यामुळे पोलिसांवर नामुष्की ओढावली.

निष्काळजीपणाचा ठपका : पोलिस अधीक्षकांपासून सर्वच अधिकारी औंधमध्ये तळ ठोकून होते. पळून गेलेल्या दरोडेखोरांच्या अटकेसाठी आठ पथके तयार करण्यात आली. यातील दोन पथकांच्या हाती पळून गेलेले तीन दरोडेखोर सापडले. मात्र, अद्यापही दोन दरोडेखोर सापडले नाहीत. या दोन दरोडेखोरांना पकडण्यात संपूर्ण पोलीस दल मग्न असतानाच पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी निष्काळजीपणा केलेल्या कर्मचाऱ्यांवर गुरुवारी सकाळी निलंबनाची कारवाई केली.

चौकशी लागली : त्यामध्ये औंध पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत बधे, ठाणे अंमलदार संतोष कोळी, हवालदार कुंडलिक कटरे, शिवानंद नारायणी आणि अंकुश गलांडे या चार पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या सर्वांची प्राथमिक चाैकशीही लावण्यात आली आहे. सध्या औंध पोलिस ठाण्याचा प्रभारी कारभार म्हणून सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

हेही वाचा : Two Robbers Recaptured : औंध पोलिसांचे लाॅकअप फोडून पळालेले ५ पैकी दोन दरोडेखोर पुन्हा ताब्यात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.