ETV Bharat / state

Koyna Dam Water Release : कोयना धरणातून 1050 क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठी सावधानतेचा इशारा

कोयना धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातून सायंकाळी पाच वाजता 1050 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे कोयना आणि कृष्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

koyna dam
कोयना धरण
author img

By

Published : Jul 13, 2022, 9:09 PM IST

सातारा - कोयना धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातून सायंकाळी पाच वाजता 1050 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे कोयना आणि कृष्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

प्रतिसेकंद 49 हजार क्युसेक पाण्याची आवक - कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. यामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू झाली आहे. सध्या प्रतिसेकंद 49,325 क्युसेक इतकी आवक होत आहे. पावसाचा जोर आणि शिल्लक पाऊसकाळ पाहता धरण व्यवस्थापनाने पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आज पायथा वीजगृह कार्यान्वित करून पाणी नदीपात्रात सोडले आहे. यामुळे कोयना आणि कृष्णा नद्यांच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ होणार आहे.

कोयना धरणात 40.63 टीएमसी पाणीसाठा - कोयना धरणातील पाणीसाठा आज सायंकाळी पाच वाजता 40.63 टीएमसी झाला आहे, तर धरणाची पाणी पातळी 2095 फूट झाली आहे. बुधवारी दिवसभरात धरण पाणलोट क्षेत्रातील कोयनानगर येथे 70 मिलीमीटर, नवजा येथे 79 मिलीमीटर आणि महाबळेश्वर येथे 137 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.