ETV Bharat / state

कोयना धरण पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ, एकूण पाणीसाठा 62.93 टीएमसी

author img

By

Published : Aug 5, 2020, 9:37 PM IST

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने गेल्या २४ तासांत धरणाच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ होवून आता उपलब्ध एकूण पाणीसाठा 62.93 टिएमसी इतका झाला आहे. या चोवीस तासांत धरणातील पाणीसाठ्यात 8 टिएमसीने तर पाणीउंचीत 9.1 फुटाने वाढ झाली आहे.

कोयना धरण पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ
कोयना धरण पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ

सातारा : जिल्ह्यातील कोयना धरणांतर्गत विभागासह पाटण तालुक्यात जोरदार वारे व दमदार पाऊस पडत आहे. मंगळवार ते बुधवार 5 वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत कोयना धरणातील पाणीसाठ्यात तब्बल 8 टिएमसीने तर पाणीउंचीत 9.1 फुटाने वाढ झाली आहे. याच चोवीस तासांत धरणातंर्गत विभागातील कोयनानगर येथे 225 मिलीमीटर, नवजा 328 मिलीमीटर, महाबळेश्वर 345 मिलीमीटर व वळवण येथे 277 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे धरणात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण प्रचंड वाढले असून सध्या प्रतिसेकंद सरासरी 92,017 क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे.

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने गेल्या २४ तासांत धरणाच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ होवून आता उपलब्ध एकूण पाणीसाठा 62.93 टिएमसी इतका झाला आहे. 105 टिएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या या धरणाला पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी यापुढे 42.07 टिएमसी पाण्याची गरज आहे. पावसाचा जोर असाच राहीला तर येत्या आठवडाभरातच हे धरण पूर्ण क्षमतेने भरेल. त्यानंतरचा पाऊस व धरणात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण लक्षात घेऊन लवकरच धरणाचे 6 वक्री दरवाजे वर उचलून त्यातून पूर्वेकडे कोयना नदीपात्रात पाणी सोडण्याच्या शक्यताही व्यक्त केल्या जात आहेत.

कोयना धरणात सध्या एकूण उपलब्ध पाणीसाठा 62.93 टिएमसी पैकी उपयुक्त साठा 57.93 टिएमसी, पाणीउंची 2121.11 फूट, जलपातळी 646.760 मीटर इतकी झाली आहे. सध्या धरणात प्रतिसेकंद सरासरी 92,017 क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे. बुधवारी सकाळी ही आवक प्रतिसेकंद सरासरी 1 लाख 18 हजार 692 इतकी वाढली होती. मंगळवार ते बुधवार संध्याकाळी पाच वाजेपर्यंतच्या चोवीस तासांतील व एक जूनपासून आजपर्यंतचा एकूण पाऊस पुढीलप्रमाणे आहे. कोयना 225 मिलीमीटर (2286), नवजा 328 मिलीमीटर (2568), महाबळेश्वर 345 मिलीमीटर (2529), वळवण 277 मिलीमीटर (3249), मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

या चोवीस तासांत धरणातील पाणीसाठ्यात 8 टिएमसीने तर पाणीउंचीत 9.1 फुटाने वाढ झाली आहे. सध्या कोयना धरण पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून पूर्वेकडे कोयना नदीपात्रात सोडण्यात येणारे पाणी बंद ठेवण्यात आले आहे. दरम्यान पूर्वेकडे पाटण तालुक्यातही वादळी वाऱ्यासह दमदार पाऊस पडत असल्याने कोयना नदीसह अन्य छोट्या, मोठ्या नद्यांच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. कोयना नदीपात्रातही मोठी वाढ झाली असून प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.