ETV Bharat / state

कराडमध्ये 'विजय दिवस' समारोहाला सुरुवात, सोमवारी थरारक प्रात्यक्षिके

कराड तालुक्यातील शेणोली गावचे सुपूत्र आणि निवृत्त कर्नल संभाजीराव पाटील यांच्या पुढाकारासह सैन्य दलाच्या सहकार्याने गेल्या 21 वर्षापासून कराडात विजय दिवस सोहळा साजरा होत आहे.

Victory Day ceremony begins in Karad
कराडमध्ये 'विजय दिवस' समारोहाला सुरुवात
author img

By

Published : Dec 16, 2019, 1:44 AM IST

सातारा - बांगलादेश मुक्ती लढ्यात भारताने पाकिस्तानवर मिळविलेल्या विजयाप्रित्यर्थ कराड येथील त्रिशक्ती फाऊंडेशनच्या वतीने सलग 21 वर्षापासून विजय दिवस सोहळा आयोजित केला जात आहे. यंदा या सोहळ्याचे 22 वे वर्ष असून सोमवारी दुपारी कराडच्या छत्रपती शिवाजी स्टेडियमवर मुख्य सोहळ्यात थरारक प्रात्यक्षिके कराडकरांना अनुभवायास मिळणार आहेत. विजय दिवस सोहळा 3 दिवस चालतो. शनिवारी शोभायात्रेने या सोहळ्यास प्रारंभ झाला होता.

हेही वाचा - कराड-चिपळूण मार्गावर एसटी-मोटरसायकल अपघात, एक ठार

कराड तालुक्यातील शेणोली गावचे सुपूत्र आणि निवृत्त कर्नल संभाजीराव पाटील यांच्या पुढाकारासह सैन्य दलाच्या सहकार्याने गेल्या 21 वर्षापासून कराडात विजय दिवस सोहळा साजरा होत आहे. 1971 च्या बांगलादेश मुक्ती लढ्यात भारताने पाकिस्तानवर विजय मिळविला होता. त्या विजयाप्रित्यर्थ देशात मोजक्या ठिकाणी विजय दिवस सोहळा साजरा करण्यात येतो. त्यामध्ये कराडचाही समावेश आहे. या सोहळ्यामुळे कराडचा देशपातळीवर लौकीक झाला आहे.

हेही वाचा - सातारा पालिकेत नगरसेवकाचे आक्षेपार्ह आंदोलन; कर्मचाऱयांनी केला निषेध

माजी सैनिकांची त्रिशक्ती फाऊंडेशन ही संस्था या सोहळ्याचे आयोजन करते. आतापर्यंत राजकीय, सामाजिक, क्रीडा, सैन्य दलातील पदकप्राप्त अधिकार्‍यांसह चित्रपटसृष्टीतील नामवंतांनी विजय दिवसाच्या मुख्य सोहळ्याला हजेरी लावली आहे. सोहळ्यात लष्करी जवानांच्या हवाई कसरती, थरारक प्रात्यक्षिके, लष्करी डॉग शो, पोलीस बँड वादन, मराठा लाईट इन्फन्ट्री जवानांची मल्लखांब प्रात्यक्षिके, डेअर डेव्हिल्स पथकाची मोटरसायकलवरील थरारक प्रात्यक्षिके कराडकरांना अनुभवयास मिळणार आहेत.

तीन दिवसांच्या या सोहळ्यात कराड दौड, लष्करी शस्त्रांचे प्रदर्शन, रक्तदान शिबीर, सैनिक मेळावा, शिवकाळातील शस्त्रांचे प्रदर्शन, असे भरगच्च कार्यक्रम होतात.

Intro:बांगला देश मुक्ती लढ्यात भारताने पाकिस्तानवर मिळविलेल्या विजयाप्रित्यर्थ कराड येथील त्रिशक्ती फाऊंडेशनच्यावतीने सलग 21 वर्षापासून विजय दिवस सोहळा आयोजित केला जात आहे. यंदा या सोहळ्याचे 22 वे वर्ष असून सोमवारी दुपारी कराडच्या छ. शिवाजी स्टेडियमवर मुख्य सोहळ्यात थरारक प्रात्यक्षिके कराडकरांना अनुभवायास मिळणार आहेत.Body:  
कराड (सातारा) - बांगला देश मुक्ती लढ्यात भारताने पाकिस्तानवर मिळविलेल्या विजयाप्रित्यर्थ कराड येथील त्रिशक्ती फाऊंडेशनच्यावतीने सलग 21 वर्षापासून विजय दिवस सोहळा आयोजित केला जात आहे. यंदा या सोहळ्याचे 22 वे वर्ष असून सोमवारी दुपारी कराडच्या छ. शिवाजी स्टेडियमवर मुख्य सोहळ्यात थरारक प्रात्यक्षिके कराडकरांना अनुभवायास मिळणार आहेत. विजय दिवस सोहळा तीन दिवस चालतो. शनिवारी शोभायात्रेने या सोहळ्यास प्रारंभ झाला होता.
 कराड तालुक्यातील शेणोली गावचे सुपूत्र आणि निवृत्त कर्नल संभाजीराव पाटील यांच्या पुढाकारासह सैन्य दलाच्या सहकार्याने गेल्या 21 वर्षापासून कराडात विजय दिवस सोहळा साजरा होत आहे. 1971 च्या बांगला देश मुक्ती लढ्यात भारताने पाकिस्तानवर विजय मिळविला होता. त्या विजयाप्रित्यर्थ देशात मोजक्या ठिकाणी विजय दिवस सोहळा साजरा करण्यात येतो. त्यामध्ये कराडचाही समावेश आहे. या सोहळ्यामुळे कराडचा देशपातळीवर लौकीक झाला आहे. गेली सलग 21 वर्षे कराडमध्ये या सोहळ्याचे आयोजन केले जात आहे. 
   माजी सैनिकांची त्रिशक्ती फाऊंडेशन ही संस्था या सोहळ्याचे आयोजन करते. आतापर्यंत राजकीय, सामाजिक, क्रीडा, सैन्य दलातील पदकप्राप्त अधिकार्‍यांसह चित्रपटसृष्टीतील नामवंतांनी विजय दिवसाच्या मुख्य सोहळ्याला हजेरी लावली आहे. कराडातील छ. शिवाजी स्टेडियमवर सोमवारी (दि. 16 डिसेंबर) होणार्‍या मुख्य सोहळ्यात लष्करी जवानांच्या हवाई कसरती, थरारक प्रात्यक्षिके, लष्करी डॉग शो, पोलीस बँड वादन, मराठा लाईट एन्फन्ट्रीच्या जवानांची मल्लखांब प्रात्यक्षिके, डेअर डेव्हिल्स पथकाची मोटरसायकलवरील थरारक प्रात्यक्षिके कराडकरांना अनुभवयास मिळणार आहेत.   
   तीन दिवसांच्या या सोहळ्यात कराड दौड, लष्करी शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन, रक्तदान शिबीर, सैनिक मेळावा, शिवकाळातील शस्त्रांचे प्रदर्शन, असे भरगच्च कार्यक्रम होतात. सोमवारच्या मुख्य सोहळ्याला छ. शिवाजी स्टेडियमवर हजारोंच्या संख्येने अबालवृध्द हजेरी लावतात. 
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.