सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जिवंत राहण्यासाठी अफजल खानाची कबर खुली करायला हवी, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे. उदयनराजेंनी आज साताऱ्यात माध्यमांशी संवाद साधला. उदयनराजे म्हणाले की, इंग्लंडच्या संग्रहालयात असलेली छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जिवंत राहण्यासाठी अफजल खानाची कबर खुली करायला हवी, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे.
शिवरायांची तलवार ही देशाचा आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे. ही तलवार छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास सांगणारी आहे. त्यामुळे जनभावना लक्षात घेऊन ती तलवार मोठ्या मनाने ब्रिटिश सरकारने भारताकडे सोपवली पाहिजे, असे मत देखील उदयनराजेंनी व्यक्त केले आहे.
अफजलखानाची कबर काढावी हिंदू ब्राह्मण महासंघाची मागणी : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रतापगडच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खानच्या कबरी Tomb of Afzal Khan भोवतीचे अतिक्रमण करण्यात येत आहे. परंतु आता ही अफजलखानाची कबर सरकारने काढावी, अशी मागणी हिंदू ब्राह्मण महासंघाने सरकारकडे केलेली आहे. जर सरकारने अफजल खान आणि औरंगजेबाची कबर काढली नाही, तर हिंदू महासंघ कबर काढेल.
महाराष्ट्रात अफजल खान आणि औरंगजेबाच्या कबरी हव्यात कशाला त्यांचा इतिहास सर्वांना माहीत आहे. त्यामुळे सरकारने याचा विचार करावा अशी मागणी हिंदू महासभेचे आनंद दवे Anand Dave of the Hindu Mahasabha यांनी सरकारकडे केलेली आहे. हिंदू महासंघातर्फे संध्याकाळी पुण्यात होणाऱ्या दीपोत्सव कार्यक्रमात अफजलखान वधाचे बँनर लावले जाणार आहेत. पोलिसांनी बँनर लावण्याला विरोध केला असल्याची माहिती आनंद दवे यांनी दिली आहे.