सातारा : लाॅकडाऊन काळात हरिद्वारवरून मुंबईमार्गे ट्रकने आलेला मूळचा महाबळेश्वरचा तरुण बाधित निघाला. राजस्थानवरून पुणेमार्गे कोरेगावला आलेला आणखी एक तरूण बाधित असल्याचे निष्पन्न झाले.
जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. आमोद गडीकर यांनी याबाबतची माहिती दिली. शनिवारी (दि.9मे) रात्री या दोघांचे अहवाल आले. यातील एक जण महाबळेश्वर तालुक्यातील रहिवासी आहे. मुंबईहून ट्रकने येत असताना त्याला शिरवळमध्येच रोकण्यात आले होते. तो हरिद्वारवरून मुंबईमार्गे साताऱ्याला येत असल्याची माहिती त्याच्या भावाने प्रशासनाला दिली. त्रास होऊ लागल्याने त्याला शिरवळमधून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याची तपासणी केली असता कोरोनाबाधित असल्याचे समोर आले.
दुसरा 36 वर्षीय बाधित कोरगाव तालुक्यातील रहिवासी आहे. तो राजस्थानहून पुण्यात आला. तेथून कोरेगाव तालुक्यात आल्याचे समजल्यानंतर त्याला खावलीला संस्थात्मक विलगिकरण करण्यात आले होते. सातारा जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण झाले आहेत. 96 रुग्ण उपचार घेत आहेत. 3 हजार 56 व्यक्तींच्या तपासण्या निगेटिव्ह आल्या आहेत. केवळ दोन बाधितांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 20 रुग्ण उपचार घेऊन पूर्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे.
हेही वाचा - कोरोना ईफेक्ट: ६१ वर्षात प्रथमच कर्मवीर डॉ. भाऊराव पाटील पुण्यतिथी साधेपणाने साजरी