ETV Bharat / state

laborers killed in mudslide : गॅस पाईपलाईनचे काम सुरू असताना अंगावर कोसळला मातीचा ढिगारा; दोन परप्रांतीय मजुरांचा मृत्यू - laborers killed in mudslide

गॅस पाईपलाईनसाठी काढलेल्या खड्ड्यात वेल्डींगचे काम ( Welding work in pits excavated for gas pipelines ) सुरू असताना मातीचा ढिगारा अंगावर कोसळून दोन परप्रांतिय मजुरांचा मंगळवारी रात्री मृत्यू झाल्याची घटना कराड तालुक्यातील उंब्रज येथून समोर आली आहे. ( Two migrant laborers died )

laborers killed in mudslide
दोन परप्रांतिय मजुरांचा मृत्यू
author img

By

Published : Oct 5, 2022, 12:16 PM IST

Updated : Oct 5, 2022, 12:37 PM IST

सातारा : पुणे-बंगळुरू महामार्गाकडेला गॅस पाईपलाईनसाठी काढलेल्या खड्ड्यात वेल्डींगचे काम ( Welding work in pits excavated for gas pipelines) सुरू असताना मातीचा ढिगारा अंगावर कोसळून दोन परप्रांतिय मजुरांचा मंगळवारी रात्री मृत्यू ( Two migrant laborers died ) झाल्याची घटना कराड तालुक्यातील उंब्रज येथून समोर आली आहे. साहिल कुमार ओमकार चाँद वय 26, राहणार पठाणकोट, पंजाब आणि सुखेदु बिकास बेरा वय 22, राहणार पश्चिम बंगाल, अशी मृत मजुरांची नावे आहेत.

मातीचा ढिगारा अंगावर कोसळला : राष्ट्रीय महामार्गावरील शिवडे-उंब्रज येथे मंगळवारी रात्री सातारा-कराड लेनच्या बाजूच्या गॅस पाईपलाईनसाठी मोठी चर काढण्यात आली आहे. त्यामध्ये पाईपलाईनच्या वेल्डींगचे काम सुरू होते. दोन मजुर त्याठिकाणी पाईप वेल्डींगचे काम करत होते. त्याचवेळी खड्ड्याशेजारील मातीचा ढिगारा अंगावर कोसळून दोन्ही मजूर त्याखाली गाडले गेले. तेथील नागरीकांच्या मदतीने दोन्ही मजुरांना ढिगार्‍याखालून बाहेर काढण्यात आले. मात्र, त्यांचा जागीच मृत्यू झाला होता.

उंब्रज पोलीस ठाण्यात घटनेची नोंद : एसीइ पाईपलाईन क्रॉन्ट्रक्ट प्रा.लिमिटेड कंपनीचे इंजिनिअर अमित कुमार बीपीन कुमार सिन्हा यांनी उंब्रज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आमच्या कंपनीचे महामार्गालगत गॅस पाईपलाईनच्या वेल्डींगचे काम सुरू असताना मातीचा ढिगारा अंगावर कोसळून दुर्घटना घडल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. त्यावरून पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड हे या घटनेचा तपास करत आहेत.

Last Updated : Oct 5, 2022, 12:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.