ETV Bharat / state

तरुणाच्या हत्येप्रकरणात दोघांना अटक

author img

By

Published : Dec 18, 2020, 4:13 PM IST

कराडच्या भाजी मंडईत झालेल्या तरुणाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी माजी नगराध्यक्षाच्या मुलासह दोघांना अटक केलीआहे. तसेच याप्रकरणी एका अल्पवयीन मुलाला देखील ताब्यात घेण्यात आले आहे. पूर्वी झालेल्या भांडणातून ही घटना झाली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

two-arrested-in-youth-murder-case-in-karad
तरुणाच्या हत्येप्रकरणात दोघांना अटक

कराड (सातारा) - कराडच्या भाजी मंडईत झालेल्या तरुणाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी माजी नगराध्यक्षाच्या मुलासह दोघांना अटक केली
आहे. तसेच याप्रकरणी एका अल्पवयीन मुलाला देखील ताब्यात घेण्यात आले आहे. पूर्वी झालेल्या भांडणातून ही घटना झाली असल्याचे पोलिसांनी सांगितले. सईद अल्ताफ शिकलगार आणि अरीन फारूख सय्यद, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

हत्याप्रकरणात दोघांना अटक

कराडच्या गुरुवार पेठेमध्ये असलेल्या भाजी मंडईत जुबेर जहाँगिर आंबेकरी (वय 30) यांची शस्त्राने वार करून मंगळवारी हत्या करण्यात आली. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. या घटनेत तीन जणांची नावे पुढे आली होती. पोलिसांकडून या तिघांचा शोध सुरू होता. दरम्यान आरोपी कर्नाटकमध्ये जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी वारुंजी गावाच्या हद्दीत सापळा रचून, तिघांना ताब्यात घेतले. यात एका अल्पवयीन मुलाचा देखील समावेश आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. पूर्वी झालेल्या भांडणातून हत्या केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. दरम्यान या हत्येमध्ये इतर आरोपींचा देखील समावेश असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. आता पोलिसांकडून या आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.