ETV Bharat / state

सातारा जिल्ह्यात आज 23 जणांना डिस्चार्ज; जावळीत 3 गावे कन्टेन्मेंट झोन

author img

By

Published : Jun 2, 2020, 8:17 PM IST

आज कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 11, खावली कोरोना केअर सेंटर येथील 8 व रायगाव येथील 4 अशा एकूण 23 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर जिल्ह्यात आजपर्यंत विविध ठिकाणावरून आतापर्यंत 223 जण कोरोनातून बरे होऊन घरी गेले आहेत.

सातारा कोरोना
सातारा कोरोना

सातारा - जावळी तालुक्यातील रायगावच्या कोरोना केअर सेंटरमध्ये दाखल असणारे 4 जण कोरानातून पूर्णपणे बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले. आज दिवसभरात जिल्ह्यात एकूण 23 जणांना घरी सोडण्यात आले. आज कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 11, खावली कोरोना केअर सेंटर येथील 8 व रायगाव येथील 4 अशा एकूण 23 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर जिल्ह्यात आजपर्यंत विविध ठिकाणावरून आतापर्यंत 223 जण कोरोनातून बरे होऊन घरी गेले आहेत.

184 जणांचे नमुने तपासणीला

क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात 25, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड 52, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड 58, ग्रामीण रुग्णालय, वाई 7, खंडाळा 33 व कोरेगाव येथील 9 अशा एकूण 184 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने तपासणी करिता पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

जावळीत 3 गावे कन्टेन्मेंट झोन

जावळी तालुक्यातील मौजे कावडी, रांजणी व मुनावळे ग्रामपंचायत अंतर्गत (कळकोशी) क्षेत्रात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने या क्षेत्रात प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांनी सुक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले. बाधित क्षेत्रातील आपत्कालीन व जीवनावश्यक वस्तूंचा सेवा व पुरवठा सुरळीत राहण्याकरीता अन्य व्यक्तींना संबंधित प्रतिबंधित क्षेत्रामध्ये प्रवेश करण्यास व परिसरातून बाहेर पडण्यास बंदी करण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.