सातारा: खंडाळा तालुक्यातील वाठार कॉलनी येथील मुले घेऊन स्कूल व्हॅन शाळेकडे जात होती. ही घटना आज सकाळी घडली आहे. स्कूल व्हॅनमध्ये आठ ते दहा मुले होती. लोणंद-शिरवळ मार्गावर शेडगेवाडी फाट्याजवळ व्हॅनमधून धूर निघू लागला. ही बाब चालकाच्या लक्षात येताच त्याने गाडी रस्त्याकडेला थांबवली. व्हॅनमधील मुलांना बाहेर काढून, व्हॅनपासून लांब नेल्याने अनर्थ टळला. त्यानंतर काही वेळातच स्कूल व्हॅनने पेट घेतला.
स्कूल व्हॅनमध्ये होते दहा विद्यार्थी : स्कूल व्हॅनमध्ये शेडगेवाडी येथील आठ ते दहा विद्यार्थी होते. ही स्कूल व्हॅन गॅसवर चालवली जात होती, अशी प्राथमिक माहीती मिळत आहे. वाठार कॉलनी येथील हायस्कूलचाच शिपाई हा व्हॅन चालवत होता. असेही समजले आहे. व्हॅनने अचानक पेट घेतल्यावर प्रसंगावधान राखून चालकाने सर्व मुलांना सुखरूप बाहेर काढले.
विद्यार्थी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर: गॅसवर चालवली जाणारी स्कूल व्हॅन आगीत जळून खाक झाली आहे. या घटनेमुळे खंडाळा तालुक्यातील पालकांच्या काळजाचा ठोका चुकला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु, स्कूल व्हॅन आणि चालक यांच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. तर सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
आग लागण्याची अनेक कारणे: उन्हाळ्यात तापमान वाढल्याने गाड्या पेटण्याच्या घटनेत वाढ होते. गाड्या पेटण्याच्या कारणांमध्ये वाढते तापमान, शॉर्टसर्किट ही कारणे तर असतातच, परंतु मेंटेनन्स होत नसल्याने सुद्धा वाहनांना आग लागण्याच्या घटना घडतात. विद्यार्थी वाहतूक करणारी वाहने अनेकदा अनफीट असतात. तरीही विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ खेळला जातो. यासंदर्भात शाळा व्यवस्थापन आणि पालकांनी जागरूक राहणे आवश्यक आहे.
बसला आग: या आधीही अचसे नाशिक येथील राहुड घाटात चालत्या बसने पेट घेतला होता. बसला आग लागल्याचे लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान राखल्याने 35 प्रवाशांचे प्राण वाचले होते. शहादा ते मुंबई जाणाऱ्या बसला चांदवड तालुक्यातील राहुड घाटात सकाळच्या सुमारास आग लागली होती. बस चालकाने सतर्कता दाखवत बस महामार्गाच्या कडेला उभी केली. बसमधील 35 प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले होते.
ठार झालेल्याची नावे : अपघातात नरेश मनोहर उबाळे. त्यांची पत्नी वैशाली नरेश उबाळे, श्रद्धा सुहास बारस्कर, श्रावणी सुहास बारस्क या मायलेकींचा समावेश आहे. या चरासह आणखी दोन मोरवली गावात राहणारे होते. तर दीक्षा संतोष गोंधळी हि तरुणी कल्याणमध्ये राहणारी होती. तर बस चालक बालाजी मोहंती असे अपघातात मरण पावले आहेत.