सातारा - पाटण तालुक्यातील आंबेघर, ढोकावळे, मोरगिरी, कामरगाव, गुंजाळी, काठेवाडी (घेरादात्तेगड), टोळेवाडी, कातवडी-मेष्टेवाडी आदीसह अनेक ठिकाणी डोंगर-दरडी कोसळल्या आहेत. त्यामध्ये काही घरे या मातीच्या ढिगाऱ्याखाली गेली आहेत. तीन कुटुंबे बेपत्ता झाली आहेत.
पाटण तालुक्यातील मोरणा विभागात आंबेघर येथे गुरवारी मध्यरात्री गावावर दरड कोसळली. गावातील काही घरे या मातीच्या ढिगाऱ्याखाली गेली आहेत. तीन कुटुंबे बेपत्ता झाली आहेत. या घटनेची माहिती समजताच काही ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले आहेत. मदतकार्यास सुरूवात झाली आहे. मात्र पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते वाहून व पाण्याखाली गेल्यामुळे मदतकार्यात अडथळे निर्माण होत आहेत. प्रशासकीय यंत्रणा देखील तातडीने घटनास्थळी दाखल झाली आहे. एनडीआरएफ च्या टिमला या ठिकाणी प्राचारण करण्यात आले आहे.
ढिगाऱ्याखाली अडकले लोक -
पाटण तालुक्यातील ढोकावळे येथेही घरांची पडझड होऊन मातीच्या ढिगाऱ्याखाली काही लोक अडकल्याचे सांगण्यात येत आहे. पाटण तालुक्यात आंबेघर, ढोकावळे, मोरगिरी, कामरगाव, गुंजाळी, काठेवाडी (घेरादात्तेगड), टोळेवाडी, कातवडी-मेष्टेवाडी आदीसह अनेक ठिकाणी डोंगर-दरडी कोसळल्या आहेत. घरांची पडझड होऊन मातीच्या ढिगाऱ्याखाली काही लोक अडकल्याचे सांगण्यात येत आहे. पाटणचे तहसीलदार योगेश टोम्पे आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत यासंदर्भातील माहितीसाठी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे घटनेबाबतची नेमकी माहिती अद्याप हाती आलेली नाही.
तातडीने मदतकार्य सुरू करा -
अतिवृष्टीमुळे भूस्खलन झालेल्या ठिकाणी मदत कार्य तातडीने सुरु करा, अशा सूचना गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केल्या आहेत. पाटण तालुक्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे भूस्खलन झालेल्या ठिकाणी मदत कार्य तातडीने सुरु करा, अशा सूचना गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केल्या. पाटण तालुक्यातील भूस्खलन झालेल्या आंबेघर, मिरगाव-कामगारगाव या ठिकाणी एन.डी.आर.एफ. च्या पथकासमवेत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी पहाणी केली. यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, यांच्यासह तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते. अतिवृष्टीमुळे बाधीत झालेल्या स्थलांतरीत 5 हजार कुटुंबांना एक महिना पुरेल इतके जीवनावश्यक साहित्य तसेच अन्नधान्य देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच घर पडझडीमुळे बाधीत झालेल्या 500 कुटुंबांना सध्या तात्पुरत्या निवासाची व्यवस्था केलेल्या ठिकाणी ब्लँकेट, चादरी, सतरंजी इत्यादींची व्यवस्थाही करण्यात आल्याचे गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.