सातारा - सातारा तालुक्यातील एका कंपनीच्या गोजेगाव आणि शेंद्रे येथील साइटवरून लोखंडी खांब, रोख रक्कम, तसेच विजेचे किंमती साहित्य चोरून नेल्या प्रकरणी सातारा तालुका पोलिसांनी दोघांवर गुन्हा नोंदवला आहे.
कर्मचाऱ्यांवर संशयाची सुई
याप्रकरणी पोलिसांनी चिंचनेर वंदन (ता. सातारा) येथील एकास चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महावितरणची कामे करणाऱ्या विक्रांत इंजिनिअरिंग नावाची एक कंपनी गोजेगाव आणि शेंद्रे परिसरात विजेचे खांब उभारण्याचे काम करत आहे. या कंपनीतील वैभव बर्गे (रा. चिंचनेर वंदन, ता. सातारा) आणि संदीप पावस्कर (रा.हुबळी) हे दोघे कामास होते. या दोघांनी फेब्रुवारी-मार्च महिन्यात वीज वितरणच्या कामासाठी आणलेले 32 खांब, कंडक्टर, फॅब्रिकेशनचे साहित्य, बांधकाम साहित्य, मशीन्स, कर्मचारी तसेच इतरांच्या पगारासाठी आणलेले 1 लाख 93 हजार रुपयांची रोख रक्कम, असा सुमारे 15 लाख 21 हजारांचा ऐवज चोरून नेला.
पोलिसांत तक्रार
साहित्य चोरीस गेल्याचे लक्षात आल्यानंतर रघुनाथ हनुमंत दुबे (रा. पिरवाडी, ता. सातारा) यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी बर्गे याला चौकशीसाठी ताब्यात घेतले असून अधिक तपास हवालदार मालोजी चव्हाण करत आहेत.
हेही वाचा - आनेवाडी टोलनाका कर्मचाऱ्यांचा वेतनासाठी पुन्हा संप; टोलविना वाहने सुसाट
हेही वाचा - डिझेल अभावी लालपरीचा वेग मंदावला; ग्रामीण भागातील फेर्या रद्द