ETV Bharat / state

कोयनेतील प्रकल्पाचे मुख्यमंत्र्यांसमोर होणार सादरीकरण

कोयनानगर येथील नियोजित राज्य आपत्ती बचाव दल आणि पोलीस प्रशिक्षण उपकेंद्राचा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर सादर करण्यात येणार आहे. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी ही माहिती दिली. उद्धव ठाकरे यांनी कोयनानगर भेटीवेळी या प्रकल्पाला तत्वत: मान्यता दिली होती.

सादरीकरण
सादरीकरण
author img

By

Published : Jul 8, 2021, 5:03 PM IST

कराड (सातारा) - पाटण तालुक्यातील कोयनानगर येथील नियोजित राज्य आपत्ती बचाव दल आणि पोलीस प्रशिक्षण उपकेंद्राचा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर सादर करण्यात येणार आहे. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी ही माहिती दिली आहे. उद्धव ठाकरे यांनी कोयनानगर भेटीवेळी या प्रकल्पाला तत्वत: मान्यता दिली होती.

'प्रशासनाने जलद गतीने कार्यवाही करावी'

कोयनानगर येथील नियोजित राज्य आपत्ती बचाव दल आणि पोलीस प्रशिक्षण उपकेंद्र हे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून साकारणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोयना धरणाला दिलेल्या भेटीवेळी या प्रकल्पास तत्वत: मान्यता दिली होती. या प्रकल्पाचा आराखडा तयार करून मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. त्यामुळे हा प्रकल्प लवकरात लवकर उभारण्यासाठी प्रशासनाने जलद गतीने कार्यवाही करण्याची सूचना शंभूराज देसाई यांनी केली आहे. पावसाळ्यात सांगली, सातारा आणि कोल्हापूर भागात निर्माण होणार्‍या पूरपरिस्थितीत मदत कार्यासाठी एनडीआरएफ, एसडीआरएफ, पोलीस, एसआरपीएफची गरज भासते. आपत्ती काळात लोकांपर्यत मदत कार्य जलदगतीने पोहोचविण्यासाठी कोयनानगर येथे राज्य आपत्ती बचाव दल आणि पोलीस प्रशिक्षण उपकेंद्र उभारण्याची गरज होती.

मंत्रालयात झाली आढावा बैठक

एसडीआरएफ आणि पोलीस प्रशिक्षण उपकेंद्रासाठी कोयतेन 32 हेक्टर अर्थात 80 एकर जागा उपलब्ध आहे. ती महसूल विभागाकडील वापरात नसलेली जागा आहे. ही जागा महसूल विभागाकडून गृह विभागाकडे हस्तांतरीत करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांमार्फत महसूल विभागाकडे सादर करण्याचे निर्देशही शंभूराज देसाई यांनी सातारा पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. राज्य आपत्ती बचाव दल आणि पोलीस प्रशिक्षण केंद्राबाबत मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीला राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव आनंद लिमये, पोलीस महासंचालक संजय पाण्डे, गृह विभागाचे प्रधानसचिव संजय सक्सेना, सहाय्यक पोलीस महासंचालक एस. जगन्नाथन, वित्त विभागाचे सहसचिव विवेक दहीफळे, सातार्‍याचे पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

नागपूर, धुळेनंतर कोयनेत होणार तिसरे एसडीआरफ केंद्र

राज्य आपत्ती बचाव दलाची महाराष्ट्रात नागपूर आणि धुळे येथे प्रशिक्षण केंद्रे आहेत. त्यानंतर सातार्‍यातील पाटण तालुक्यात कोयनानगर येथील नियोजित केंद्र हे राज्यातील तिसरे केंद्र असणार आहे. कराड आणि पाटण हे पूरग्रस्त तालुके आहेत. पावसाळ्यात पूर आल्यानंतर नदीकाठच्या गावांना पुराचा वेढा पडतो. अशावेळी बाहेरून एसडीआरएफ आणि एनडीआरएफच्या टीमला पाचारण करावे लागते. बचाव दलाच्या तुकड्या दाखल होईपर्यंत वाट पाहावी लागते. कोयनानगरमध्ये आपत्ती बचाव दलाचे केंद्र झाल्यास तातडीने बचाव कार्य होईल, या उद्देशाने गृहराज्यमंत्री तथा पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांनी मुख्यमंत्र्यांसमोर ही संपल्पना मांडली होती. त्याला मुख्यमंत्र्यांनी तत्वत: मान्यताही दिली होती. एक महिन्यात या केंद्राचा आराखडा सादर करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहेत.

हेही वाचा - मोदी मंत्रिमंडळ २.० : नवीन केंद्रीय मंत्र्यांनी स्वीकारला पदभार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.