ETV Bharat / state

कोयना धरणाच्या सुरक्षेबाबत राज्य सरकार गंभीर - गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई

कोयना धरणाच्या सुरक्षेचा गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आढावा घेतला. यावेळी त्यांनी कोयना धरण परिसरातील आठ पोलीस चौकींना भेट देऊन सुरक्षेच्या उपाययोजनांची पाहणी केली.

Shambhuraj Desai
गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई
author img

By

Published : Jul 12, 2021, 4:36 PM IST

कराड (सातारा) - महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयना धरणाच्या सुरक्षेचा गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आढावा घेतला. यावेळी त्यांनी कोयना धरण परिसरातील आठ पोलीस चौकींना भेट देऊन सुरक्षेच्या उपाययोजनांची पाहणी केली. कोयना धरणाच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. राज्य सरकार सुरक्षेबाबत गंभीर असल्याचेही गृहराज्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

पाटणचे प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, प्रभारी डीवायएसपी डॉ. रणजित पाटील, तहसिलदार योगेश टोम्पे, कोयना धरण प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता नितीन पोतदार, कोयनानगरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत माळी यावेळी उपस्थित होते.

पाटण तालुक्यातील कोयनानगर हे महाराष्ट्रातील एक प्रमुख पर्यटन केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. कोयनानगरला पर्यटक मोठ्या संख्येने भेट देतात. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या कोयनानगर परिसराचा पर्यटन विकास आराखडा राज्य सरकारने मंजूर केला आहे. पर्यटन आराखड्यातील कामे प्रगतीपथावर असल्याने कोयनेच्या निसर्ग सौंदर्यामध्ये भर पडणार आहे, असेही गृहराज्यमंत्र्यांनी सांगितले.

महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयना धरणाच्या सुरक्षेबाबत सरकार गंभीर आहे. कोयना धरणाची सुरक्षा देखील तितकीच महत्त्वाची असल्याने कोयना धरण परिसरातील आठ पोलीस चौक्यांना प्रत्यक्ष भेट देऊन तेथील उपाययोजनांची गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंनी पाहणी केली. पोलीस चौक्यांच्या इमारती जुन्या असून त्या कालबाह्य झाल्या आहेत. पावसाळ्यात पोलिसांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. तसेच कोयना धरण परिसरातील लोखंडी टेहळणी मोर्चे हे जुने आहेत. चौक्यांच्या इमारती व टेहळणी मोर्चांची तातडीने पुनर्बांधणी करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याची सूचना आपण वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांना करणार असल्याचे मंत्री देसाई यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.