सातारा - पाटण तालुक्यातील दिवशी घाटात एस.टी बसच्या धडकेत दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली. या अपघाताची नोंद पाटण पोलीस ठाण्यात झाली आहे.
याबाबत पाटण पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ढेबेवाडी-पाटण या एस.टी बसचा (एमएच 14 बी.टी 1295) दिवशी घाटातील एका वळणावर होंडा डिलक्स या दुचाकीला (एम. एच. 50 जे. 6304) धक्का बसला. यामुळे झालेल्या अपघातात मोटारसायकलवरील जगन्नाथ धोंडी पाळेकर (वय 75 रा. पाळेकरवाडी ता. पाटण) यांचा जागीच मृत्यू झाला. तर विक्रम जगन्नाथ पाळेकर (वय 34) हे गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हेही वाचा - आनेवाडी टोल नाका आंदोलनप्रकरणी आमदार शिवेंद्रराजेंसह ८० समर्थकांवर गुन्हे दाखल
या घटनेची नोंद पाटण पोलीस ठाण्यात झाली असून पोलिसांनी एस.टी बस चालक गणेश हणमंत काळे (रा. मालदन, ता. पाटण) यांना ताब्यात घेतले आहे. या गुन्ह्याचा तपास हवालदार एच.डी पाटील करत आहेत.