ETV Bharat / state

ST Bus Accident Satara: साताऱ्यात दुचाकीस्वाराला धडक देऊन एसटी बस झाडावर आदळली - एसटी बस अपघात सातारा

ST Bus Accident Satara: साताऱ्यातील खटाव तालुक्यात रविवारी सायंकाळी एसटीचा भीषण अपघात (ST Bus Hits Biker) झाला. (ST Bus Hits Tree) दुचाकीला चिरडून एसटी झाडाला धडकली. (Bike Rider Killed In ST Bus Accident) या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला असून एसटीतील १५ जण जखमी झाले आहेत. त्यातील ८ जणांची प्रकृती गंभीर आहे. (Passenger Injured In ST Bus Accident)

ST Bus Accident Satara
एसटी बस झाडावर आदळल्याने बसचा चक्काचूर झाला
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 8, 2023, 10:43 PM IST

ब्रेक फेल झाल्याने एसटी झाडावर आदळली, बसचा झाला चक्काचूर

सातारा ST Bus Accident Satara: खटाव तालुक्यात वडूज-पुसेगाव मार्गावर भुरकवडी गावच्या हद्दीत रविवारी सायंकाळी एसटीचा भीषण अपघात झाला आहे. दुचाकीला चिरडून एसटी झाडावर आदळली. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला असून एसटीतील १५ प्रवाशी जखमी झाले आहेत. त्यातील ८ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. दरम्यान, एसटीच्या धडकेने झाड अक्षरशः मोडून पडलं.

चालकाच्या हलगर्जीपणामुळे अपघात: एसटी चालकाच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात घडला. एसटी बस झाडावर आदळल्याने एसटीतील १५ प्रवासी जखमी झाले. जखमींपैकी ८ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. जखमींवर वडूजच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गंभीर जखमींना साताऱ्याकडे हलवण्याच्या हालचाली सुरू आहेत.

दुचाकीला चिरडत एसटी झाडाला धडकली: वडूज आगाराची एसटी बस पुण्यावरून वडुजला निघाली होती. खटावच्या पुढे आल्यावर भुरकवडी गावच्या हद्दीत एका वळणावर समोरून आलेल्या दुचाकीस्वाराला धडक देऊन ही बस थेट झाडावर आदळली. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला.

एसटीत होते २५ प्रवाशी: या बसमधून साधारण २५ जण प्रवास करत होते. बसमधील प्रवाशी मोठ्या प्रमाणात जखमी झाले असून इतर प्रवाशांनी जखमींना एसटीतून गाडीतून बाहेर काढून वडुजच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. अपघाताची माहिती मिळताच पुसेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातात ठार झालेल्या व्यक्तीची ओळख रात्री उशिरापर्यंत पटली नव्हती. तसेच जखमींची नावे समजू शकली नाहीत.

एसटी बस पलटली: बुलडाणा येथील राजुर घाटात 25 जुलै, 2023 रोजी एसटी महामंडळाची बस पलटी झाल्याने असाच भीषण अपघात झाला होता. सुदैवाने ही बस पुढील दरीत कोसळली नसल्याने मोठी जीवित हानी यावेळी टळली होती. या बस अपघातात तब्बल 10 प्रवासी किरकोळरीत्या जखमी झाले होते. काही प्रवाशांना मुका मार लागला होता. तब्बल 55 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसमध्ये अनेक विद्यार्थी देखील प्रवास करत होते. बसमधील प्रवाशांना तात्काळ स्थानिकांच्या मदतीने बसचे काच फोडून बाहेर काढण्यात आलं होतं. सर्व जखमींना बुलडाणा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आलं होतं.

धावत्या बसचे ब्रेक झाले फेल: चालक वाहकांच्या सतर्कतेने अनर्थ टळला होता. खामगाव आगारातून सप्तशृंगीकडे जाणाऱ्या बसचे मलकापूर शहरातील महावीर चौकात ब्रेक निकामी झाले होते. बस थांबली नसल्याने चालक अमोल केणेकर यांनी तातडीने वाहक कमल वाघ यांना सांगितले. वाहकाने तातडीने चालत्या गाडीतून खाली उडी घेतली. तसेच बसच्या पुढील चाकासमोर मोठा दगड ठेवला. त्यामुळे बस थांबली. बसमधील पस्तीस प्रवासी खाली उतरले. चालक आणि घटनेची माहिती मलकापूर आगार व्यवस्थापक मुकुंद नावकर यांना दिली. बसची दुरुस्ती करून आगारात आणण्यात आली.

मृत आणि जखमींची नावे : अपघातात दुचाकीस्वार गणेश शिवाजी काटकर (वय ४०, रा. कुकुडवाड, ता. माण) हे जागीच ठार झाले. जखमी झालेल्या एसटी चालक धनाजी अरुण जाधव ( वय ४०, रा. येरळवाडी), चेतना अनिकेत हांगे (वय ३१, रा. दातेवाडी, ता. खटाव) यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत, तर जया अंकुश जाधव (वय ६२, रा. पुणे), कमरूल इस्लाम शेख (वय २७), हेफाजुदिन इस्लाम शेख (वय २२), नसीम शेख (वय २३), जमरुदिन शेख (वय ४०), आसरापूर लोहार (वय ३५), रफिक इस्लाम शेख (वय ३०, सर्व रा. कोलकाता), प्रियांका अमोल अवघडे (वय ३०, रा. पेडगाव), जगनाथ तात्यासाहेब भिसे (वय ७५, रा. सातारा) या जखमी प्रवाशांवर वडूज ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा:

  1. Buldhana Bus Accident : एसटी बसचा अपघात; स्टिअरिंग रॉड लॉक झाल्याने गाडी पलटी, पाहा व्हिडिओ
  2. Bus Accident at Rajur Ghat: ब्रेक फेल झाल्याने राजूर घाटात बस पलटली, ५५ प्रवाशांचे थोडक्यात वाचले प्राण
  3. Bus Accident In Nashik : सप्तश्रृंगी घाटात एसटी बस 400 फूट खोल दरीत कोसळून अपघात; 1 महिला ठार, तर 18 प्रवासी जखमी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.