ETV Bharat / state

'ई टीव्ही भारत विशेष'; 'चढणी'चे मासे पकडल्याने 'जैव साखळी धोक्यात', 'असा' होतो परिणाम - साताऱ्यातील मासेमारीची बातमी

ग्रामीण भागातील नदीनाले मुसळधार पावसामुळे दुथडी भरुन वाहत आहेत. त्यामुळे नागरिक चढणीचे मासे पकडण्यासाठी नदीत गळ टाकून बसले आहे. मात्र चढणीचे हे मासे पकडणे जैव विविधतेसाठी धोक्याचे असल्याचे मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

Satara Fishing
मासेमारी करताना नागरिक
author img

By

Published : Jun 22, 2021, 2:12 PM IST

Updated : Jun 23, 2021, 1:23 AM IST

सातारा - पावसाळ्यात नदी नाले दुथडी भरुन वाहल्याने मासे प्रजननासाठी चढणीचा उलटा प्रवास करतात. त्यामुळे ग्रामीण भागातील खवैय्ये नदीकाठांवर गळ टाकून आहेत. त्यामुळे चढणीचे मासे पकडण्यात मोठा धोका आहे. हे मासे पकडल्याने जैव साखळी धोक्यात येत आहे. त्यामुळे चढणीचे मासे न पकडता दोन महिने मासेमारी बंद ठेवावी, असा इशारा मत्स्यव्यवसाय विभागाने दिला आहे. आमचे प्रतिनिधी शैलेंद्र पाटील यांनी याबाबत घेतलेला हा विशेष आढावा खास आमच्या वाचकांसाठी. . .

आढावा घेताना प्रतिनिधी

का होतो माशांचा अनोखा उलटा प्रवास ?

पावसाला नुकती सुरुवात झाल्याने जिल्ह्यातील नद्यांमध्ये गढूळ पाणी वाहत आहे. नदीतील असंख्य मासे प्रजननासाठी उलटा प्रवास सुरू करतात. माशांचा हा उलटा प्रवास साताऱ्याचे मानद वन्यजीव रक्षक सुनील भोईटे यांनी स्पष्ट केला आहे. डोंगर, झरे, ओहळ, भाताची खाचरे आणि तात्पुरत्या पाणथळ जागेत हे मासे प्रजननासाठी येतात. शांत पाणी पाहून तेथे ते अंडी घालतात व पुन्हा मागे परततात. या अंड्यातून माशांची पिल्ले जन्म घेतात. वर्षातून एकदाच गोड्या पाण्यातील माशांना निसर्ग अंडी घालण्यासाठी संधी देतो आणि पिल्ले संगोपनासाठी वातावरण निर्माण करून देतो असे ते म्हणाले.

नदीच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने प्रवास करणाऱ्या माशांना चढाचे किंवा चढणीचे मासे म्हणतात. गोड्या पाण्यातील माशांना प्रजननासाठी संधी द्यायला हवी. तो त्यांचा नैसर्गिक अधिकार आहे, असे मत पर्यावरण अभ्यासक सागर कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

मासेमारीसाठी दोन महिने थांबण्याचे नागरिकांना आवाहन. . .

उथळ पाण्यात अंडी घालण्यासाठी आलेले मासे ही संधी समजून गावागावातील असंख्य नागरिक चढणीचे मासे पकडतात. माशांच्या प्रजननाचा हा काळा असल्यामुळे हे दोन महिने मासेमारी करू नये, असे मत मत्स्यव्यवसाय विभागाचे सहायक आयुक्त अभयसिंह शिंदे इनामदार यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केले. माशांच्या प्रजननावर आपले वर्षभराचे मत्स्यान्न अवलंबून असते. पोटात अंडी असलेले मासे आपण आधीच मारून टाकले तर आपल्याला चांगले तयार झालेले मासे कसे मिळणार असा सवालही त्यांनी यावेळी केला.

प्रजाती नष्ट होण्याचा आहे धोका . . .

खडशी, वांब, मरळ, मळे हे मासे प्रजननक्षम झालेले असतात. या काळात ते चविष्ट असले, तरी मत्स्य प्रेमींना स्वतःच्या जिभेला थोड्या काळासाठी मुरड घालावी लागेल. अन्यथा त्यांच्या प्रजननात अडथळा आणल्यामुळे गोड्या पाण्यातील माशांच्या प्रजाती नष्ट होण्याचा धोका आहे. त्यामुळे जलचरांची जीव साखळी धोक्यात येऊ शकते. या दिवसात होणारी मासेमारी थांबवण्यासाठी शासन स्तरावर विचार विनिमय सुरू आहे. प्रत्येकाने नैतिक जबाबदारीतून या दिवसात मासेमारीसाठी जाऊ नये, असे आवाहन अभयसिंह शिंदे इनामदार यांनी 'ईटीव्ही भारत'च्या माध्यमातून नागरिकांना केले.

Last Updated : Jun 23, 2021, 1:23 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.