ETV Bharat / state

साताऱ्यात दोन चोरट्यांकडून ६ चोरीच्या मोटरसायकल जप्त - 2 motorcycle thieves arrested

मोटर सायकल चोरणारी टोळी गजाआड करण्यात सातारा पोलिसांना यश आले आहे. आज सापळा रचून या टोळीला जेरबंद करण्यात आले. या संशयितांनी ६ मोटरसायकल चोरल्याची कबुली दिली आहे.

Six stolen motorcycles seized
चोरीच्या मोटरसायकल जप्त
author img

By

Published : Sep 29, 2020, 7:19 PM IST

सातारा - पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषन शाखेच्या पथकाने दोन संशयितांना अटक करुन त्यांच्याकडून चोरीच्या सहा मोटारसायकल जप्त केल्या. सातारा, उंब्रज व काशिळ येथून या मोटारसायकल चोरल्याची कबुली चोरट्यांनी दिली आहे.

कुमार शिवाजी सकटे (वय 30, रा. नांदगाव, ता. जि. सातारा) व योगेश शिवाजी कदम (वय 35, रा. वाढे, ता. जि. सातारा) अशी संशयितांची नावं आहेत. पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जऱ्हाड व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दोन संशयित चोरीच्या मोटारसायकल विक्री करण्यासाठी साताऱ्यात येणार असल्याची खबर मिळाली. त्या आधारे सापळा लावून त्यांना अटक करण्यात आली. या संशयितांनी ६ मोटरसायकल चोरल्याची कबुली दिली. सातारा एस. टी. स्टॅन्ड पार्किंग, उंब्रज व काशीळ येथून या मोटारसायकल चोरल्याची त्यांनी कबुली दिली. उपनिरीक्षक प्रसन्न जऱ्हाड, हवालदार सुधीर बनकर, संतोष पवार, मुबिन मुलाणी, शरद बेबले, प्रवीण फडतरे, मुनीर मुल्ला, प्रमोद सावंत, निलेश काटकर, विशाल पवार व विजय सावंत यांनी कारवाईत सहभाग घेतला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.