ETV Bharat / state

श्री ब्रह्मचैतन्य संस्थानाकडून अन्नधान्याचे वाटप, पोलीस पाटलांचा पुढाकार - लॉकडाऊन आणि संचारबंदी

गरजूंना गहू, तांदूळ, रवा, साखर, डाळ आणि तेल या कोरड्या शिध्याचे वाटप करण्याची जबाबदारी तालुक्यातील पोलीस पाटलांनी उचलली आहे. दहिवडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ आणि प्रमोद दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्यांतर्गत कार्यरत असणाऱ्या ४८ पोलीस पाटलांनी या कामाला सुरुवात केली.

श्री ब्रह्मचैतन्य संस्थानाकडून अन्नधान्याचे वाटप

author img

By

Published : Apr 1, 2020, 2:17 PM IST

सातारा - लॉकडाऊन आणि संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर गरजू लोकांच्या पोटाचा प्रश्न उभा ठाकला आहे. अशात, गोंदवल्यातील श्री ब्रह्मचैतन्य महाराज संस्थानने गरजूंना अन्नधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. हे धान्य माण तालुक्यातील संबंधितांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी पोलीस पाटलांनी घेतली आहे.

गरजूंना गहू, तांदूळ, रवा, साखर, डाळ आणि तेल या कोरड्या शिध्याचे वाटप करण्याची जबाबदारी तालुक्यातील पोलीस पाटलांनी उचलली आहे. दहिवडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ आणि प्रमोद दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्यांतर्गत कार्यरत असणाऱ्या ४८ पोलीस पाटलांनी या कामाला सुरुवात केली.

समाधी मंदिरातील कोठीतून या वस्तूंचा पहिला ट्रक मंगळवारी रात्री पोलीस पाटलांनीच भरून रवाना केला. पहिल्या टप्प्यात पन्नास गावातील एक हजार लोकांना याचे वाटप करण्यात येणार आहे. सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीत पोलीस पाटील मोठ्या जबाबदारीने काम हाताळत आहेत. त्यामुळे, कामाचा ताण असूनदेखील सामाजिक भान ठेवून गरिबांसाठी पोलीस पाटील पुढे आले आहेत.

श्री ब्रह्मचैतन्य संस्थानाकडून अन्नधान्याचे वाटप

सध्याची आपत्कालीन परिस्थिती हाताळताना कामाचा ताण वाढला असला तरी गोरगरिबांना अन्नधान्य वाटण्याची जबाबदारी आम्ही घेतली आहे. या कामातून श्री महाराजांची सेवा करण्याची संधी मिळाली असल्याची भावना सातारा जिल्हा पोलीस पाटील संघटनेचे कार्याध्यक्ष महेश शिंदे यांनी व्यक्त केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.