सातारा- जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील मुख्य ठिकाणी पाटण, माण, फलटण, कोरेगाव, सातारामध्ये चालू केलेल्या शिवभोजन थाळीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यामुळे अनेक गोरगरीबांचा व मजुरांचा पोटाचा प्रश्न काही प्रमाणात मिटल्याचे पहायला मिळत आहे. येथेही सोशल डिस्टसिंग पाळले जात असल्याचे पहावयास मिळत आहे.
हेही वाचा- परिस्थिती योग्य नाही.. IPL तर विसरुन जा; सौरव गांगुलींचे सूचक संकेत
गोरगरीब व मजुरांचा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, शिवभोजनाच्या माध्यमातून गरिबांना जेवण मिळत आहे. शिवभोजन थाळीमुळे गरिबांना दिलासा मिळाला आहे. याशिवाय जेवनासाठी केंद्रांवर येणारे नागरिक सोशल डिस्टचे पालन करीत आहेत.