सातारा - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेवाची वार्षिक चैत्र यात्रा रद्द करण्यात आली आहे. शिंगणापूर येथील शंभू महादेवाची वार्षिक यात्रेचा २५ मार्च ते ६ एप्रिल कालावधी होणार होती. मात्र आज मंदिर दर्शन व अभिषेक साठी बंद करण्यात आले आहे. शिंगणापूर यात्रेसाठी दरवर्षी ८ ते १० लाख भाविक येत असतात.
शिंगणापूर यात्रा कालावधीत गर्दी रोखण्यासाठी १४४ कलमानुसार जमावबंदी आदेश लागू करण्यात येत असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी बी. बी. महामुनी यांनी सांगितले.
शंभू महादेव मंदिर बंद
शिंगणापूर यात्रेवर प्रशासनाने निर्बंध घातल्याचे आदेश प्रशासनाने दिल्यानंतर खासदार उदयनराजे भोसले व राजमाता कल्पनाराजे भोसले यांच्या परवानगीने मंगळवारी दुपारीच शंभू महादेव मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात आले. मंदिर व्यवस्थापक ओंकार देशपांडे व पुजारी, सेवाधारी मंडळी यांनी यात्राकालावधी अखेर मंदिर दर्शनासाठी बंद राहणार असल्याचे जाहीर केले.