ETV Bharat / state

शरद मोहोळच्या हत्येचे धागेदोरे साताऱ्यापर्यंत, पिस्तूल पुरवणाऱ्या कराडच्या तरूणास अटक - गँगस्टर शरद मोहोळ

Sharad Mohol Murder Case Update : शरद मोहोळच्या हत्या प्रकरणात सातारा कनेक्शन समोर आलंय. मोहोळच्या हल्लेखोरांना पिस्तूल पुरवणारा तरुण कराडमधील असून पुणे पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

sharad mohol murder case update a boy who supplied pistol to sharad mohol attackers arrested in karad
शरद मोहोळच्या हत्येचे धागेदोरे साताऱ्यापर्यंत, पिस्तूल पुरवणाऱ्या कराडच्या तरूणास अटक
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 12, 2024, 11:45 AM IST

सातारा Sharad Mohol Murder Case Update : पुण्यातील गँगस्टर शरद मोहोळच्या हल्लेखोरांना पिस्तूल पुरवणाऱ्या कराडमधील तरुणाला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. धनंजय वाटकर, असं या तरुणाचं नाव असून तो कराड पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. दरम्यान, मार्च महिन्यात 14 पिस्तुलांसह दहा जणांना अटक करण्यात आली होती. त्यात धनंजय वाटकर याचाही समावेश होता.

आतापर्यंत दहा जणांना अटक : शरद मोहोळच्या हत्येप्रकरणी यापूर्वी पुणे पोलिसांनी आठ जणांना अटक केली होती. त्यानंतर आणखी दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयितांची संख्या दहा झाली आहे. नुकत्याच अटक केलेल्या दोघांपैकी धनंजय वाटकर हा कराड पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.

कराड पोलिसांनी जप्त केली होती 14 पिस्तुलं : कराड पोलिसांनी मार्च 2023 मध्ये ओगलेवाडी येथे 14 पिस्तुलांसह दहा जणांना अटक केली होती. त्यात धनंजय वाटकर याचाही समावेश होता. मोहोळच्या हल्लेखोरांना पिस्तूल पुरविल्या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, शरद मोहोळ हत्येप्रकरणी तपास सुरू असताना पिस्तुल पुरवणारा कराडचा असल्याची माहिती हाती येताच पुणे पोलिसांनी त्याला अटक केली.

सातारा जिल्ह्यात पिस्तूल विक्रीचे मोठे रॅकेट : सातारा जिल्ह्यातील तरूणांचे मोठे रॅकेट पिस्तूल विक्रीमध्ये सक्रिय आहे. महिन्यात कुठे ना कुठे पिस्तूल जप्तीची कारवाई होते. मागील वर्षात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पिस्तुले जप्त करण्यात आली आहेत. गुरूवारी (11 जानेवारी) साताऱ्यातील मंगळवार तळे परिसरात योगेश देवकर या तरूणाकडून पिस्टल आणि काडतूस जप्त करण्यात आले आहे.

दिवसाढवळ्या कुख्यात गँगस्टर शरद मोहोळवर गोळीबार : पुण्यातील कोथरुडमधील सुतारदरा परिसरात 5 जानेवारीला दिवसाढवळ्या कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ याच्यावर गोळीबार करण्यात आला होता. यावेळी मोहोळवर मारेकऱ्यांनी चार गोळ्या झाडल्या होत्या. मोहोळला गोळी लागल्यावर त्याला पुण्यातील वनाज इथं सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

हेही वाचा -

  1. "माझा नवरा वाघ होता, मी वाघीण", स्वाती मोहोळची प्रतिक्रिया, नितेश राणेंनी घेतली भेट
  2. शरद मोहोळ हत्या प्रकरण : 'मी' मामासाठी हत्या करणार, आरोपीचा इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर
  3. शरद मोहोळ हत्या प्रकरण : पोलिसांनी 8 आरोपींना 'फिल्मी स्टाईल' केली अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.