ETV Bharat / state

कृष्णा साखर कारखान्याकडून दोनशे रूपयांचा दुसरा हप्ता जाहीर - सातारा जिल्हा बातमी

कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुकच्या कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे 2020-21 या हंगामात ऊस घातलेल्या शेतकरी सभासदांना प्रतिटन 200 रूपयांचा दुसरा हप्ता जाहीर केला आहे. कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

साखर कारखाना
साखर कारखाना
author img

By

Published : Jun 6, 2021, 4:48 PM IST

कराड (सातारा) - कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुकच्या कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे 2020-21 या हंगामात ऊस घातलेल्या शेतकरी सभासदांना प्रतिटन 200 रूपयांचा दुसरा हप्ता जाहीर केला आहे. कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दुसर्‍या हप्त्याची रक्कम पुढील आठवड्यात शेतकर्‍यांच्या खात्यावर वर्ग होईल, अशी माहिती डॉ. भोसले यांनी दिली आहे. खरीप हंगामाच्या तोंडावर दुसरा हप्ता मिळणार असल्याने शेतकर्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

कृष्णा कारखान्याने 2020-21 च्या गळीत हंगामात 154 दिवसांमध्ये 12 लाख 15 हजार मेट्रिक टन उसाचे गळीत करून 14 लाख 76 हजार 200 क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. कारखान्याला यंदाच्या हंगामात 12.75 टक्के इतका साखर उतारा मिळाला आहे.

कृष्णा कारखान्याने यापूर्वी शेतकर्‍यांना 2 हजार 600 रूपयांचा पहिला हफ्ता दिला आहे. कडक निर्बंधाच्या स्थितीत आणि खरीप हंगामात शेतकर्‍यांना आर्थिक आधार मिळावा, या उद्देशाने एफआरपीचा 200 रूपयांचा दुसरा हफ्ता देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला. ऊस बिलाच्या दुसर्‍या हप्त्याची रक्कम पुढील आठवड्यात शेतकर्‍यांच्या खात्यावर वर्ग केली जाणार आहे.

हेही वाचा - 'माझी वसुंधरा 'अभियानात कराड नगरपालिका राज्यात दुसरी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.