सातारा - महसूल विभागाच्या कोणत्याही परवानग्या न घेता, अनेक शेतकऱ्यांच्या शेतातून तसेच माण महसूल विभागाच्या हद्दीतून बेकायदेशीर उत्खनन करून ओएफसी केबल टाकण्याचे काम चालू होते. यावर महसूल विभागाने कारवाई करत पोकलेन मशीन जप्त केली. शिंगणापूर येथे ही कारवाई करण्यात आली असून तहसीलदार बाई माने यांनी ही कारवाई केली आहे.
शासकीय व खासगी जागेच्या हद्दीतील केलेल्या बेकायदेशीर उत्खननाबाबत गावकामगार तलाठी व मंडल अधिकारी यांनी पंचनामे केले होते. तसेच त्यांना उत्खनन करू नये, असे सांगण्यात आले होते. मात्र, सदर उत्खनन संबंधित ठेकेदार यांनी सुरू ठेवल्याने ही कारवाई केली असल्याचे महसूल विभागाने सांगितले.