सातारा - तालुक्यातील एका गावात 14 वर्षाच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. संजय चव्हाण, प्रशांत चव्हाण व किरण चव्हाण अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
14 वर्षांच्या मुलावर तिघांकडून अत्याचार
संबंधित अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार करण्याची घटना 2019 मध्ये घडलेली आहे. तालुका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित 14 वर्षांचा मुलगा सातारा तालुक्यातील एका गावात राहत असून तो आठवीमध्ये शिकत आहे. संजय तानाजी चव्हाण याने 2019 मध्ये अल्पवयीन मुलाला गावातील शिवारात तर, प्रशांत सुभाष चव्हाण याने गावातच एका घरात तर, किरण पांडुरंग चव्हाण याने गावातील शिवारात नेऊन जबरदस्तीने अनैसर्गिक अत्याचार केले.
हेही वाचा - मुख्यमंत्री महोदय, इकडेही लक्ष द्या; उपोषणकर्त्या शेतकऱ्यांचा जलसमाधीचा प्रयत्न
आईने दिली फिर्याद
या प्रकरणी मुलाच्या आईने सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर संजय चव्हाण, प्रशांत चव्हाण आणि किरण चव्हाण या तिघांवर अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अधीक्षक अंचल दलाल यांनी भेट दिली असून पोलिसांना तपासाबाबत आवश्यक त्या सूचना केल्या. पोलीस उपनिरीक्षक देव अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा - धक्कादायक.. पुणे-नगर महामार्गावर खोदकामात आढळला मानवी हाडांचा सापळा