ETV Bharat / state

केरळच्या कोट्यवधी रुपयांच्या दरोड्याचे साताऱ्यात धागेदोर, मुख्य संशयिताला अटक - सातारा चोरी न्यूज

केरळ राज्यात खळबळ माजवणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या साडेसात किलो सोन्यावरील दरोडा प्रकरणाचे धागेदोरे साताऱ्यापर्यंत पोहोचले आहेत. केरळ पोलिसांनी दरोड्यातील काही सोने हस्तगत केले आहे. या प्रकरणी साताऱ्यातील एका डॉक्टरसह काही व्यापारी व काही तरूण पोलिसांच्या रडारवर आहेत.

satara
satara
author img

By

Published : Aug 23, 2021, 2:02 AM IST

सातारा : केरळ राज्यात खळबळ माजवणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या साडेसात किलो सोन्यावरील दरोडा प्रकरणाचे धागेदोरे साताऱ्यापर्यंत पोहोचले आहेत. केरळ पोलिसांनी दरोड्यातील काही सोने हस्तगत केले आहे. या प्रकरणी साताऱ्यातील एका डॉक्टरसह काही व्यापारी व काही तरूण पोलिसांच्या रडारवर आहेत.

सातारा पोलिसांचा दुजोरा

साताऱ्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी केरळ पोलिसांच्या तपासाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तसेच या प्रकरणी साताऱ्यातील काही लोकांना ताब्यात घेतली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. केरळ राज्यातील पलक्कड येथील मारूथा रोड क्रेडिट सोसायटीत साडेसात किलो सोने लुटीचा प्रकार घडला. या प्रकरणी अटक केलेला संशयित परेश अशोक अंबुर्ले उर्फ निखील अशोक जोशी याला केरळ पोलिसांनी साताऱ्यातील एका हॉटेलमधून ताब्यात घेतले आहे.

जोशीच्या सोने खरेदीदारांच्या मागावर पोलीस आहेत. या खरेदीदारांमध्ये एका नामांकीत डॉक्टरचे नाव पुढे आले आहे. त्यानंतर खरेदीदारांची साखळीच पुढे आली आहे. पोलिसांच्या ससेमिऱ्याच्या भीतीने साताऱ्यातील काही सराफ व्यापारी घर बंद करून परागंदा झाल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.

केरळमधील सर्वात मोठा दरोडा

काही घरांवर केरळ पोलिसांची पाळत असल्याचे समजते. सोने खरेदी प्रकरणात संबंधीत डॉक्टर, काही व्यापारी आणि काही तरुण पोलिसांच्या रडारवर आहेत. दोन पोलीस अधिकारी व 24 जणांचा समावेश असलेली दोन तपास पथके साताऱ्यातील एका लॉजवर तळ ठोकून आहेत. तेथूनच केरळ पोलिसांची तपास सूत्रे फिरत आहेत. केरळच्या 'मारूथा'वर पडलेला दरोडा म्हणजे केरळ राज्यातील सर्वात मोठा दरोडा असल्याचे मानले जात आहे.

साताऱ्यात पोलिसांची धरपकड

केरळमधील मारुथा रोड सहकारी ग्रामीण क्रेडिट सोसायटीतील साडेसात किलो सोने, 18 हजारांची लुट संशयित परेश अशोक अंबुर्ले उर्फ निखील जोशी यानेच केल्याचे आजपर्यंतच्या तपासात स्पष्ट झाले आहे. त्याने लुटलेले सोने हस्तगत करण्यासाठी पोलिसांची धरपकड सुरू आहे. सर्व सोने साताऱ्यात असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यातील काही हस्तगतही झाले आहे. नेमके किती सोने हस्तगत झाले आणि चोरीच्या सोने खरेदीमध्ये किती व कोणते बडे मासे पोलिसांच्या गळाला लागले? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. लवकरच केरळ पोलीस माध्यमांसमोर या गुन्ह्याचा पर्दाफाश करतील, असे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा - उदयनराजेंवर शिवेंद्रराजेंनी डागली तोफ; 'ते' थापांचा पाऊस पाडण्यात माहीर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.