सातारा - जिल्ह्यात काल (गुरुवारी) रात्री 12 वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या अहवालानुसार 1 हजार 395 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 15 बाधितांचा मृत्यू झाला. गेल्या 24 तासात वाढलेली रुग्णसंख्या पाहता जिल्ह्यात दर मिनिटाला एक नवा रूग्ण वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सातारा तालुका हाॅटस्पाॅट
जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू झाल्यापासून गेल्या वर्षात काल 15 एप्रिल रोजी 1 हजार 184 हा रेकॉर्डब्रेक रूग्णवाढीचा आकडा समोर आला. त्यानंतर आज शुक्रवारी आलेल्या अहवालात सुमारे 200 रुग्णांची वाढ झाली आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंतची 1 हजार 395 ही उच्चांकी रूग्णवाढ आहे. त्यात सातारा तालुक्यात सर्वाधिक 319 रूग्ण असून एकट्या सातारा शहर व परिसरात 182 रुग्ण आढळले. फलटणला 185, कराडला नवे 150, वाई तालुक्यात 100, कोरेगांवला 85, खटावला 99 तर माणला 83 नवे रुग्ण आढळले आले.
मिनिटाला एक रुग्ण
जिल्ह्यात कोरोना महामारीने उच्चांक गाठला असून गेल्या 24 तासात 6 हजार 423 संशयितांच्या चाचण्या घेण्यात आल्या. सर्वात जास्त 3 हजार 434 रॅपीड अँन्टिजेन टेस्ट केल्या असून त्यापैकी 862 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. बाधितांचा दर 21.72 टक्के इतका आहे. आज शुक्रवारी संध्याकाळपर्यंत 595 नागरिकांना घरी सोडण्यात आले. जिल्ह्यात विविध ठिकाणी सुमारे 11 हजार रुग्ण उपचार घेत आहेत. तर 2 हजार 43 बाधितांचा मृत्यू झाला आहे.