ETV Bharat / state

सातारा जिल्ह्यात 17 ते 26 जुलैदरम्यान टाळेबंदी, 'ही' दुकाने राहाणार सुरू - Satata lockdown rules

जिल्ह्यातील सर्व किराणा दुकाने, सर्व किरकोळ व ठोक विक्रेते, सर्व इतर व्यवसाय करणारे व्यापारी दुकाने 17 ते 22 पर्यंत संपूर्णत: बंद राहणार आहेत. तर 22 ते 26 जुलै कालावधीत सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत केवळ अत्यावश्यक वस्तुंचा पुरवठा करणारी दुकाने व त्यांचे ठोक विक्रेते यांची दुकाने सुरू ठेवता येणार आहेत.

संग्रहित
संग्रहित
author img

By

Published : Jul 14, 2020, 9:22 PM IST

सातारा - कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी 17 ते 26 जुलै दरम्यान टाळेबंदी जाहीर केली आहे. टाळेबंदीमुळे नागरिकांना सर्व नियमांचे पालन करावे लागणार आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1,936 वर पोहोचली आहे.

जिल्ह्यातील सर्व किराणा दुकाने, किरकोळ व ठोक विक्रेते, इतर सर्व व्यवसाय, व्यापारी दुकाने 17 ते 22 पर्यंत संपूर्णत: बंद राहणार आहेत. तर 22 ते 26 जुलै कालावधीत सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत केवळ अत्यावश्यक वस्तुंचा पुरवठा करणारी दुकाने व त्यांचे ठोक विक्रेते यांची दुकाने सुरू ठेवता येणार आहेत. इतर सर्व दुकाने व आस्थापना बंद राहतील.

● सर्व केश कर्तनालय, सलुन/स्पा/ब्यूटी पार्लर दुकाने संपुर्णतः बंद राहतील.

● सर्व किरकोळ व ठोक विक्रीचे ठिकाणे मोंढा/आडत भाजी मार्केट/फळे विक्रेते/आठवडी व दैनिक बाजार/ फेरीवाले हे सर्व ठिकाणे दि. 17 ते 22पर्यंत बंद राहतील. 22 ते 26 या काळात केवळ सर्व अत्यावश्यक किरकोळ व ठोक विक्रीचे ठिकाणे मोंढा/आडत भाजी मार्केट/फळे विक्रेते/आठवडी व दैनिक बाजार सकाळी 9 ते दुपारी 2. या काळात चालू राहतील.

● मटन, चिकन, अंडी, मासे इत्यादीची विक्री 17 ते 22 बंद राहतील. 22 ते 26 या काळात सकाळी 9 ते दु. 2 वाजेपर्यंत चालू राहतील.

● सर्व प्रकारची खाजगी बांधकाम्/कन्स्ट्रशनची कामे संपूर्णतः बंद राहतील. तथापि, ज्या बांधकामाच्या जागेवर कामगारांसाठी निवास व्यवस्था असेल त्यांना काम सुरू ठेवता येईल. तसेच सरकारी कामे चालू राहतील.

● सर्व प्रकारचे मंगल कार्यालय, हॉल तसेच लग्न समारंभ, स्वागत समारंभ संपूर्णतः बंद राहतील, मात्र दिनांक 14 जुलैपूर्वी परवानगी घेण्यात आलेले खाजगी जागेतील व मंगल कार्यालयातीन लग्न समारंभास 20 पेक्षा कमी व्यक्तीच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम करता येणार आहेत.

● सामाजिक/राजकीय/क्रिडा/मनोरंजन/सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रम व सभा संपूर्णतः बंद राहणार आहेत.

● धार्मिक स्थळे/सार्वजनिक प्रार्थनास्थळे ही सामान्य व्यक्तीकरिता बंद राहतील, तथापि, सर्व धार्मिक स्थळ / सार्वजनिक प्रार्थनास्थळातील नित्य नियमाचे धार्मिक कार्यक्रम संबंधित धर्मगुरु, पुजारी यांना करता येतील.

● उपहारगृह, बार, लॉज, हॉटेल्स रिसॉर्ट, मॉल,बाजार, मार्केट संपुर्णत: बंद राहतील.

● वाईन शॉप, बिअर शॉपी, देशी दारु दुकाने व तत्सम आस्थापना, तसेच मदयाची घरपोच सेवा 17 ते 22 जुलैपर्यंत बंद राहतील. 22 ते 26 जुलै या कालावधीत फक्त घरपोच सुविधा चालू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.

● झोमॅटोसारख्या ऑनलाईन पोर्टलवरुन मार्गविले जाणारे खाद्यपदार्थ पुरवठा सेवा तसेच हाॅटेल, रेस्टॉरंट यांचेमार्फत देणेत येणारी घरपोच सेवा बंद राहणार आहे. तर 22 ते 26 जुलै कालावधीत घरपोच सेवा सुरू ठेवता येणार आहे.

● सार्वजनिक /खाजगी क्रिडांगणे / मोकळया जागा, उदयाने, बगीचे हे संपुर्णत: बंद राहतील. तसेच सार्वजनिक ठिकाणी सकाळी व सायकांळी फिरणे प्रतिबंध राहणार आहे.

सातारा जिल्ह्यात खालील अत्यावश्यक बाबी / सेवा मर्यादीत स्वरुपात व निर्बंधासह सुरू राहणार आहेत.

● दूध विक्री व घरपोच दुधाचे वितरण सकाळी. सकाळी 6 ते 10 या वेळात सुरू राहील.

●कोणतेही रुग्णालय लॉकडाऊनचा आधार घेवून रुग्णांना आवश्यक सेवा नाकारणार नाही.

● सर्व मेडीकल दुकाने सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत चालू राहतील, तथापि, ऑनलाईन औषध वितरण सेवा व हॉस्पिटल संलग्न औषध दुकाने 24 तास सुरू राहील.

● पेट्रोलपंप व गॅसपंप सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेत सुरू राहतील.

● पाणीपुरवठा करणाऱ्या टँकर, एलपीजी गॅस सेवा, घरपोच गॅस वितरण व रेशन दुकान नियमानुसार सुरु

● औद्योगिक व अत्यावश्यक वस्तुंची पुरवठा साखळी अबाधित ठेवण्यासाठी आवश्यक अशी स्थानिक, अंतरजिल्हा, अंतरराज्य वाहतूक शासकीय नियमानुसार सुरू
ठेवता येणार आहे.

● शेती व दुग्ध व्यवसाय तसेच कुक्कुटपालन या अनुषंगीक कामे करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे.

● कृषी सेवा केंद्र/बि-बियाणे/खते/किटकनाशक दुकाने/चारा दुकाने ही सर्व दुकाने सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत चालू राहतील. शेतमालाची कृषी निगडीत प्रक्रिया उदयोग सुरू राहतील. सर्व प्रकारच्या शेतीमालाची वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

● सर्व राष्ट्रीयकृत व आरबीआयने मान्यता दिलेल्या बँका, सहकारी बँका, गांव पातळीवरील विविध कार्यकारी सोसायटी, एलआयसी कार्यालय किमान मनुष्यबळासह सकाळी 9 ते दुपारी 2 या काळात सुरु राहतील. बँकांच्या इतर ग्राहकसेवा सुरू राहतील.

● एमआयडीसी किंवा खासगी जागेवरील सध्या चालू असलेले सर्व औद्योगिक आस्थापना चालू राहतील. तसेच या आस्थापनांसाठी जाण्यासाठी आणि परतीसाठी दोन चाकी व चार चाकी वाहन किंवा जिल्ह्याबाहेरील कर्मचाऱ्यांसाठी निश्चित केलेल्या बसमधूनचे प्रवासाला परवानगी राहील. (दोन चाकी वाहनांस एक व्यक्ती, चार चाकी वाहनांमध्ये 3 व्यक्ती व बसमध्ये प्रवासी क्षमतेच्या 50% मर्यादेपर्यंत परवानगी राहील) तथापि त्यांनी त्यांनी ओळखपत्र सोबत बाळगणे बंधनकारक आहे. यापूर्वी बाहेरील जिल्ह्यातील कर्मचारी यांची औद्योगिक आस्थापनेसाठी वाहतूक करणेबाबत चालू असलेली वाहन व्यवस्था चालू राहील. प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील व्यक्तींनाच कामावर उपस्थित राहता येईल.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.