ETV Bharat / state

सातारा शहर पोलिसांकडून चोरीचे ३ गुन्हे उघड; अल्पवयीन मुलासह तिघे ताब्यात - Satara Theft News

काही दिवसांपूर्वी पोवईनाक्यावर कासट मार्केट येथील जय श्रीराम मोबाईल शॉपीत चोरी झाली होती. गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या पथकाने तपास करत कराड तालुक्यातील मसूर येथून एकाला ताब्यात घेतले. त्याने मित्राच्या सहाय्याने मोबाईल चोरल्याचे कबुल केले. पोलिसांनी त्याच्या दुसऱ्या साथीदारासही ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीस गेलेले १२ मोबाईल, ब्ल्युटुथ स्पिकर, हेड फोन व इतर साहित्य हस्तगत केले.

Satara Police
सातारा पोलीस
author img

By

Published : Jun 13, 2020, 9:51 PM IST

सातारा - गेल्या काही दिवसांमध्ये शहरात झालेल्या तीन चोऱ्या उघडकीस आणण्यात शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाला यश आले. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून चोरीला गेलेले १२ मोबाईल, ब्ल्युटुथ स्पिकर, हेडफोन, एक बोकड आणि एक मोटारसायकल हस्तगत करण्यात आली आहे.

राहुल ज्ञानदेव रावते (वय-२५ मुळ रा.जुन्नर,पुणे) व शाशिकांत आनंदा शिंदे (वय ३०,मुळ रा.रांजणगाव,शिरूर,जि.पुणे) अशी पकडलेल्या चोरांची नावे आहेत. सध्या दोघेही शहरातील रविवार पेठेत राहतात.

काही दिवसांपूर्वी पोवईनाक्यावर कासट मार्केट येथील जय श्रीराम मोबाईल शॉपीत चोरी झाली होती. गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या पथकाने तपास करत कराड तालुक्यातील मसूर येथून एकाला ताब्यात घेतले. त्याने मित्राच्या सहाय्याने मोबाईल चोरल्याचे कबुल केले. पोलिसांनी त्याच्या दुसऱया साथीदारासही ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीस गेलेले १२ मोबाईल, ब्ल्युटुथ स्पिकर, हेड फोन व इतर साहित्य हस्तगत केले. या दोघांनीच रविवार पेठेतील पैलवान मटण शॉप मालकाचा बोकड चोरल्याचीही कबुली दिली.

दरम्यान, याच पथकाने संशयावरुन आणखी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून सदरबझार परीसरातून चोरीला गेलेली मोटारयाकल जप्त करण्यात आली. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक एन.एस. कदम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.