ETV Bharat / state

माऊलींची पालखी आज धर्मापुरीत होणार दाखल; विठ्ठलाच्या भेटीची आस शिगेला - शनिवार

आज शनिवारी हा पालखी सोहळा धर्मापुरीत म्हणजे सोलापुर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे.

माऊलींच्या पालखीचे चांदोबाचे लिंब येथे उभे रिंगण पार पडले.
author img

By

Published : Jul 6, 2019, 10:43 AM IST

सातारा - "जाता पंढरीसी सुख वाटे जीवा, आनंदे केशवा भेटताची" असे म्हणत पंढरीच्या वाटेवर निघालेली संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज सोलापूर जिल्ह्यात दाखल होणार आहे. माऊलींची पालखी सातारा जिल्ह्यातील फलटणचा मुक्काम करुन बरडगावकडे मार्गस्थ झाली होती. त्यानंतर लोणंद, तरडगाव, फलटण व बरड या चार ठिकाणी वारकऱ्यांनी विसावा घेतला. मार्गामध्ये चांदोबाचे लिंब येथे उभे रिंगण पार पडले.

माऊलींची पालखी आज धर्मापुरीत होणार दाखल ; विठ्ठलाच्या भेटीची आस शिगेला

आज शनिवारी हा पालखी सोहळा धर्मापुरीत म्हणजे सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. पुणे, सातारा असा प्रवास केल्यावर सोलापूर जिल्ह्याचे प्रवेशद्वार गाठले की वारकऱ्यांना पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ तीव्र होत जाते. पंढरीच्या जवळ आलो आहोत, या भावनेने वारकरी हर्षून जातात.

शुक्रवारी दुपारी पिंपरे येथे विसावा घेतल्यावर पालखी बरडगावला मुक्कामी होती. आज पालखीचा मुक्काम हा सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते येथे असणार आहे. सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केल्यावर माऊलींचे पहिले गोल रिंगण हे सदाशिवनगर (पुरंदावडे) येथील कारखानास्थळावर संपन्न होणार आहे. माऊलींच्या पालखी सोहळ्यातील हे सर्वात मोठे रिंगण असते.

Intro:सातारा संतश्नेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी फलटणचा मुक्काम करुन बरडगावकडे मार्गस्थ झाली होती. जिल्ह्यातील लोणंद, तरडगाव, फलटण व बरड या चार ठिकाणी मुक्काम व चांदोबाचे रिंगण केले आहे. आज
शनिवारी पालखी सोहळा हा धर्मापुरीत म्हणजे सोलापुर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे.

Body:पुणे ,सातारा ,नंतर सोलापुर जिल्ह्याच प्रवेशद्वार गाठलं की ,भाविकांना पंढरी जवळ दिसायला लागते. पंढरीच्या अगदी जवळ आलो आहोत या भावनेनं वारकरी हर्षुन जातात.

आजचा पालखीचा मुक्काम हा नातेपुते या ठिकाणी असणार आहे. शुक्रवारी दुपारी पिंपरेतला विसावा संपवुन पालखी बरडगावला मुक्कामासाठी होती.

सोलापुर जिल्ह्यात प्रवेश केला की, माऊलींच पहिलं गोलं रिंगण हे सदाशिवनगर (पुरंदावडे )येथील कारखानास्थळावर संपन्न होणार आहे. माऊलींच सर्वात मोठं रिंगण असते.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.