ETV Bharat / state

कृषी विधेयकावरून काँग्रेस व मित्रपक्ष करतायेत दिशाभूल : रावसाहेब दानवे - Raosaheb Danve on congress

राजकीय हेतुने प्रेरीत होऊन काँग्रेस व त्यांचे मित्रपक्ष शेतकऱ्यांची दिशाभुल करत आहेत, अशी टीका केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली.

Raosaheb Danve
रावसाहेब दानवे
author img

By

Published : Oct 5, 2020, 9:11 PM IST

Updated : Oct 5, 2020, 10:41 PM IST

सातारा - संसदेने मंजूर केलेली कृषी विधेयके हे २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यासाठी फायदेशीरच ठरणार आहेत. मात्र, राजकीय हेतुने प्रेरीत होऊन काँग्रेस व त्यांचे मित्रपक्ष शेतकऱ्यांची दिशाभुल करत आहेत, अशी टीका केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली.

रावसाहेब दानवे - केंद्रीय राज्यमंत्री

साताऱ्यात ते पत्रकार परिषदेत बोलत होते. दानवे पुढे म्हणाले, संसदेच्या सभागृहात शेतीविषयक विधेयके मंजूर करण्यात आली. यानंतर या विधेयकाला वेगवेगळ्या पक्ष - संघटनांकडून विरोध करण्यात येत आहे. त्यामागील विरोधकांच्या आक्षेपाला कोणतीही बैठक नाही. राज्यसभेत बहुमत नसतानाही या विधेयकाला पाठिंबा व्यक्त करण्यात आला. सरकार शेतीमाल हमीभावाने खरेदी करणार नाही हा कॉंग्रेस व मित्र पक्षांचा केवळ कांगावा आहे. कृषी विधेयकामुळे बाजार समिती मोडकळीस येतील ही अनाठायी भीती काँग्रेस व्यक्त करत आहे. शेतकऱ्यांना या विधेयकामुळे बाजार समितीबाहेर माल विक्री करण्याचा अधिकार मिळाला आहे. येत्या दोन वर्षांत शेतीला उर्जितावस्था येऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न दामदुप्पट होईल. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी मोदी सरकारने गेल्या सहा वर्षांत पावले उचलली आहेत. याचाच भाग म्हणून संसदेमध्ये कृषीविषयक विधेयके मंजूर करण्यात आल्याचे दानवे म्हणाले.

लोकसभेत काही चालले नाही आणि लोकांसमोर जाण्यासाठी काही मुद्दा नसल्याने काँग्रेस आणि मित्रपक्षांनी या विधेयकाला विरोध करायला सुरूवात केली आहे. त्यांची ही टीका राजकीय आकसातून आहे. लोकांमध्ये जाण्यासाठी त्यांना एखादा मुद्दा हवा होता. या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये अपप्रचार करण्यात येत आहे. मात्र, या विधेयकाला विरोध करणारे शेतकऱ्यांमध्ये गैरसमज पसरवण्यात यशस्वी होणार नाहीत. शेतकऱ्यांनी चिंता करू नये. सरकार त्यांचा शेतमाल हमीभावानेच खरेदी करेल, अशी ग्वाही दानवे यांनी दिली. यावेळी भाजपचे प्रदेश सरचिटणीस सुरजीत सिंह ठाकूर, खासदार रणजितसिंह निंबाळकर, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरे, भरत पाटील, अतुल भोसले, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार यावेळी उपस्थित होते.

Last Updated : Oct 5, 2020, 10:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.