सातारा - सातारा, महाबळेश्वर परिसरात मेघगर्जनेसह सायंकाळच्या सुमारास पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे सकाळपासून उष्णता निर्माण झालेल्या हवेत गारवा निर्माण झाला. अचानक आलेल्या पावसाचा फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या पर्यटकांनी आनंद लुटला. त्याबरोबरच या पावसामुळे काही ठिकाणी स्ट्रॉबेरी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
जिल्ह्यातील रहिमतपूर, कोरेगाव, पुसेगाव, फलटण या भागात तुरळकरित्या पाऊस पडला. दुपारी २ अडीजच्या दरम्यान वीजेच्या कडकडाटासह पाऊस पडला. त्यामुळे अनेक भागात पावसामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता.