ETV Bharat / state

Prithviraj Chavan On Loksabha Election: पंतप्रधान लोकसभेच्या निवडणुका मुदतीआधी घेतील, कारण... पृथ्वीराज चव्हाण यांचे मोठे वक्तव्य - Prithviraj Chavan

Prithviraj Chavan On Loksabha Election: साताऱ्यातील कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात सुरू असलेल्या काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेत बोलताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी मोठे वक्तव्य केले आहे. (Narendra Modi) पाच राज्ये आपल्या हातातून जातील, या भीतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेच्या निवडणुका मुदतीआधी घेतील, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत. (Lok Sabha Election 2024)

Prithviraj Chavan On Loksabha Election
पृथ्वीराज चव्हाण यांचे मोठे वक्तव्य
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 20, 2023, 10:04 PM IST

सातारा Prithviraj Chavan On Loksabha Election: येत्या वर्षभरात राज्यात अनेक स्थित्यंतरे होतील. तसेच पुढील काही महिन्यात लोकसभेच्या निवडणुका होण्याची शक्यतादेखील पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. केंद्रातील मोदी सरकार देशातील विरोधी पक्षांना बेसावध ठेवून निवडणुका घेईल. तिसऱ्यांदा पंतप्रधान आपणच व्हावे, म्हणून हुकुमशाही देशांचे अनुकरण करत 'एक देश, एक निवडणूक' ही पद्धत मोदी आणतील. अशी भीतीदेखील पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली.

कॉंग्रेसकडून माणुसकीची वागणूक: पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, काँग्रेसनं माणूस म्हणून प्रत्येकाला वागणूक दिली. गुलामगिरीतून हा देश बाहेर काढून महासत्ता करण्याची शक्ती देशाच्या घटनेत आहे. हेच संविधान नसते तर ब्रिटिश गेले नसते. वर्णव्यवस्था कायम राहिली असती. समता, मानवता तोडण्याचा या मूठभर लोकांचा डाव आहे. त्यासाठी मोदी यांचा चेहरा पुढे केला असला तरी बोलवता धनी 'आरएसएस' आहे. त्यांच्या मागे आपली माणसे धावत असल्याचा टोलाही भाजपाबरोबर गेलेल्या नेत्यांना पृथ्वीराज चव्हाणांनी लगावला.

गद्दार, लाचारांचे राज्य झाल्याची खंत: मंत्री असेल तरच विकास होईल, असे काही नेते सांगतात. पण विकास समाजाचा की, स्वतःचा करायचा? तुरुंगात जाण्याची भीती होती का? असा सवाल पृथ्वीराज चव्हाणांनी अजित पवारांचा नामोल्लेख टाळून केला. राज्यातील विश्वासघाती सत्तेला जनता कधीही आशीर्वाद देणार नाही. गद्दार व लाचारांचे राज्य झाल्याचे वाईट वाटते. खोकी घेऊन सरकार पाडले. पण आता तुम्ही निवडणुका घ्या. जनता तुम्हाला जागा दाखवेल, असा इशाराही त्यांनी दिला.

सत्ता मिळविण्यासाठी नरेंद्र मोदी कोणत्याही थराला जातील. केंद्र सरकारने अब्जावधी रुपये जाहिरातीवर खर्च करूनही सामान्य लोकांच्या परिस्थितीत फरक पडलेला नाही. केंद्र सरकारने देशातील मालकीच्या मालमत्ता विकल्या. काहींचे खासगीकरण केले. रेल्वेची ९० हजार हेक्टर जमीन लिलावात काढली-माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

हेही वाचा:

  1. Parliament Special Session 2023 : ऐतिहासिक! लोकसभेत दोन तृतीयांश मतांनी महिला आरक्षण विधेयक मंजूर
  2. Praniti Shinde on Women Reservation Bill: ... तर मोदी सरकारनं विधेयक आधीच मंजूर केलं असतं- प्रणिती शिंदे
  3. Rahul Gandhi on women reservation: महिला आरक्षणात ओबीसींना आरक्षण देण्याची राहुल गांधींची मागणी, अमित शाह म्हणाले...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.