ETV Bharat / state

पाटण तालुक्याचा पर्यटन विकास आराखडा तयार करा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचना - पाटण तालुका पर्यटन बातमी

पाटण तालुक्यात पर्यंटनाला मोठा वाव आहे. पर्यटन विकासातून स्थानिकांना रोजगार निर्मिती होऊ शकते. त्यामुळे पाटण तालुक्याचा पर्यटन विकास आराखडा तयार करा, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या.

cm
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोयना धरणाला दिली भेट
author img

By

Published : Dec 10, 2020, 5:09 PM IST

कराड (सातारा) - पाटण तालुक्यात पर्यंटनाला मोठा वाव आहे. पर्यटन विकासातून स्थानिकांना रोजगार निर्मिती होऊ शकते. त्यामुळे पाटण तालुक्याचा पर्यटन विकास आराखडा तयार करा, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या. तसेच अधिवेशनानंतर आराखड्याबाबत बैठक घेऊन शासन पाटण तालुक्याच्या पर्यंटनाला चालना देईल, असेही त्यांनी सांगितले.

cm
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोयना धरणाला दिली भेट

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोयना धरणाला दिली भेट

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोयना धरणाला भेट दिली. यावेळी त्यांच्या समवेत सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, ऊर्जा मंत्री नितीन राऊत, सहकार मंत्री तथा साताऱ्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, परिवहन मंत्री अनिल परब, गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार महेश शिंदे, आमदार अनिल बाबर, जलसंपदा विभागाचे सचिव संजय घाणेकर, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, उपवनसंरक्षक भारतसिंह हाडा, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक विलास रजपूत, जलसंदा विभागाचे अधीक्षक अभियंता संजय डोईफोडे उपस्थित होते.

प्रारंभी जलसंदा विभागाचे सचिव घाणेकर यांनी महाराष्ट्राचे शक्तिपीठ कोयना प्रकल्प पुस्तिका व स्मृतीचिन्ह देवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वागत केले. तसेच कोयना धरणाची संपूर्ण माहिती मुख्यमंत्र्यांना दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.