सातारा - नमाज पठण करण्यासाठी एकत्र आलेल्या 23 जणांना कराड शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यातील 12 जणांना न्यायालयाने प्रत्येकी एक हजार रूपये दंडाची आणि दंड न भरल्यास 15 दिवसांच्या साध्या कैदेची शिक्षा दिली आहे.
२३ जणांपैकी उर्वरीत 11 जण अल्पवयीन असल्याने त्यांना समज देवून सोडण्यात आले. कराडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
हेही वाचा - कोरोनाचा व्हायरस दोन वेळा लग्न मुहूर्ताला डसला, नववधूने स्कुटीवरुन सासर गाठून संसार थाटला
तबलगी समाजाचे नेते अमीर अनिस तांबोळी आणि अमीर युसूफ पटेल यांनी घरीच नमाज अदा करण्याचे आवाहन मुस्लिम बांधवांना केले होते. प्रशासनाने नेमून दिलेल्या तीन ते चार व्यक्तीच मशिदीमध्ये जातील, अशी सूचनाही केली होती. तरी देखील एकत्र येऊन नमाज पठण केले जात असल्याचे समजताच पोलिसांनी कारवाई करत एका घरातून 23 जणांना ताब्यात घेतले.