सातारा - फिरायला गेल्यानंतर पाय घसरून अजिंक्यतारा ( Person fell from Ajinkyatara Fort ) किल्ल्यावरून शुक्रवारी (दि. ५) सायंकाळी खोल दरीत पडलेल्या ६४ वर्षांच्या व्यक्तीला शिवेंद्राराजे रेस्क्यू टीमच्या मदतीने १४ तासांनी दरीतून बाहेर ( Ajinkyatara Fort satara ) काढण्यात यश आले. हणमंत जाधव असे त्यांचे नाव आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सायंकाळी फिरायला गेल्यानंतर पडले दरीत - साताऱ्यातील हणमंत जाधव हे शुक्रवारी सायंकाळी किल्ले अजिंक्यतारावर फिरायला गेले होते. त्यावेळी पाय घसरून ते दरीत पडले. रात्रीचा अंधार आणि कोसळणाऱ्या पावसात तब्बल १४ तास ते तेथेच पडून होते. एक व्यक्ती दरीत पडली असल्याची बाब शनिवारी सकाळी व्यायामाला गेलेल्या लोकांच्या निदर्शनास आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शिवेंद्रराजे रेस्क्यू टीमला पाचारण केल्यानंतर बचाव कार्याला सुरुवात झाली. अथक प्रयत्नानंतर त्या व्यक्तीला दरीतून बाहेर काढण्यात यश आले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अंधार आणि पावसात रात्रभर होते दरीत - हणमंत जाधव हे सायंकाळी दरीत पडल्याचे कोणालाही कळले नाही. अंधार आणि पावसात संपूर्ण रात्रभर ते दरीतच होते. ही बाब आज सकाळी उघडकीस आल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जाधव यांना दरीतून बाहेर काढण्यासाठी अडचणी येत होत्या. त्यामुळे, रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले. त्यांच्या मदतीने हणमंत जाधव यांना दरीतून बाहेर काढण्यात यश आले.