ETV Bharat / state

टोळी युद्धातुन सोळवंडे याची हत्या, दोन जण अटकेत - killed-in-gang-war

पवन सोळवंडे याची तब्बल 11 गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. ही हत्या टोळी युद्धातून झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे.

पवन सोळवंडे
author img

By

Published : Aug 22, 2019, 12:21 AM IST

सातारा- कथित गुंड पवन दीपक सोळवंडे याची हत्या ही टोळी युद्धातून झाली असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. प्रत्यक्षदर्शींच्या सांगण्यावरून यातील आरोपी निष्पन्न झाले असून त्यापैकी गोळ्या झाडणार्‍यांना फुस लावणार्‍या दोघा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान मयत सोळवंडे यांच्या नातेवाईकांनी हल्लेखोरांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर मोक्कांतर्गत कारवाई करावी, अन्यथा आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा घेऊन कराड शहर पोलीस ठाण्यात बराच काळ ठिय्या मारून निदर्शने केली.

पोलीस उपाधीक्षक नवनाथ ढवळे यांनी जमावाला शांत केले. पोलीस तात्काळ कारवाई करतील असे आश्वस्त करून त्यांनी मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांच्या ताब्यात दिला. याबाबतचे सविस्तर वृत्त असे, गेल्या काही दिवसांपासून कराड शहरात टोळी युद्धाची धुसफूस सुरू होती. सोमवारी रात्री मंगळवार पेठेत राहणार्‍या बांधकाम व्यवसायिक निहाल अल्ताफ पठाण यास अभिनंदन झेंडे, प्रतीक चव्हाण, पवन सोळवंडे, अविनाश काटे, प्रशांत करवले या चौघांनी खंडणी मागितली होती. खंडणीची रक्कम न मिळाल्याने या चौघांनी तलवारी घेऊन निहाल पठाण यांच्या घरासमोर जात दहशत माजवली होती.

याप्रकरणी निहाल पठाण यांच्या तक्रारीवरून कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हाही नोंद करण्यात आला आहे. मंगळवारी दिवसभर पोलीस पवन सह त्याच्या अन्य साथीदारांचा शोध घेत होते. मात्र ते पोलिसांच्या हाती लागली नाही. मंगळवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पवन त्याच्या घरी आला होता. त्यावेळी त्याने मी संध्याकाळी जेवायला परत येतो असे कुटुंबीयांना सांगितले. त्यानुसार रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास तो घरीही आला. तो घरासमोरच असलेल्या स्वच्छतागृहात गेला असताना काही युवक चारचाकी वाहनातून त्या ठिकाणी आले.

यावेळी संबंधित युवकांनी पवनवर बेछूट गोळीबार करत त्याची हत्या केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखत रातोरात घटनास्थळाचा पंचनामा करून शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला. बुधवारी सकाळी मृतदेहाची उत्तरीय तपासणी झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांसह समाज बांधवांनी आक्रमक पवित्रा घेतला. यावेळी पवनचे नातलग व समाज बांधव महिला युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी संतप्त जमावाने पोलीस सहकार्यामुळेच पवनचा खून झाला असल्याचा गंभीर आरोप केला.

या हल्ल्या प्रकरणातील आरोपींना साथ करणारे हे कोण आहेत, हल्लेखोरांना पैसा व शस्त्रे कोणी पुरवली, याचा पोलिसांनी शोध घ्यावा. या प्रकरणात दोषी असणार्‍या सर्व जणांना तात्काळ अटक करावी. तसेच त्यांच्यावर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली. यासाठी जमावाने घोषणाबाजी करत जोरदार निदर्शने केली. सुमारे तासभर शहर पोलीस ठाण्याच्या आवारात ठीयाही मांडला. यावेळी कराड तालुक्याचे पोलीस उपाधीक्षक नवनाथ ढवळे यांनी अतिशय सक्षम पणे परिस्थिती हाताळत जमावाला शांत केले. पोलिसांनी कोणत्याही प्रकारचे आरोपींना अथवा अन्य कोणालाही गुन्ह्यासाठी सहकार्य केले नसल्याचे जमावाच्या निदर्शनास आणून दिले. या घटनेतील दोषींना अटक करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यासाठी पोलिसांना आवश्यक वेळ देणे जरुरीचे असल्याचे जमावाला पटवून दिले.

त्यानंतर जमावाने मृतदेह ताब्यात घेण्यास संमती दर्शवली. अंत्यविधी करण्यासाठी कोल्हापूर कळंबा जेलमध्ये असलेल्या पवन याच्या भावाला आणण्यासाठी यंत्रणा पाठविण्यात आली. याप्रकरणी प्रत्यक्षदर्शीच्या फिर्यादीवरून दहा ते बारा जणांवर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यापैकी चौघांची ओळख पटली असून उर्वरित लोक पुढच्या टप्प्यात ओळखली जातील, असे पोलीस उपाधीक्षक नवनाथ ढवळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Intro:कथित गुंड पवन दीपक सोळवंडे याची हत्या ही टोळी युद्धातून झाली असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. प्रत्यक्षदर्शींच्या सांगण्यावरून यातील आरोपी निष्पन्न झाले असून त्यापैकी गोळ्या झाडणार्‍यांना फुस लावणार्‍या दोघा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान मयत सोळवंडे यांच्या नातेवाईकांनी हल्लेखोरांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर मोक्कांतर्गत कारवाई करावी. अन्यथा आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेऊन कराड शहर पोलीस ठाण्यात बराच काळ ठिय्या मारून निदर्शने केली. Body:पोलिस उपाधीक्षक नवनाथ ढवळे यांनी जमावाला शांत करत पोलीस तात्काळ कारवाई करतील असे आश्वस्त करून मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांच्या ताब्यात दिला. याबाबतचे सविस्तर वृत्त असे, गेल्या काही दिवसांपासून कराड शहरात टोळी युद्धाची धुसफूस सुरू होती. सोमवारी रात्री मंगळवार पेठेत राहणार्‍या बांधकाम व्यवसायिक निहाल अल्ताफ पठाण यास अभिनंदन झेंडे, प्रतीक चव्हाण, पवन सोळवंडे, अविनाश काटे, प्रशांत करवले या चौघांनी खंडणी मागितली होती. खंडणीची रक्कम न मिळाल्याने या चौघांनी तलवारी घेऊन निहाल पठाण यांच्या घरासमोर जात दहशत माजवली होती. 

याप्रकरणी निहाल पठाण यांच्या तक्रारीवरून कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हाही नोंद करण्यात आला आहे. मंगळवारी दिवसभर पोलीस पवन सोनवणे सह त्याच्या अन्य साथीदारांचा शोध घेत होते. मात्र ते पोलिसांच्या हाती लागली नाही. मंगळवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पवन त्याच्या घरी आला होता. त्यावेळी त्याने मी संध्याकाळी जेवायला परत येतो असे कुटुंबीयांना सांगितले. त्यानुसार रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास तो घरीही आला. तो घरासमोरच असलेल्या स्वच्छतागृहात गेला असताना काही युवक चारचाकी वाहनातून त्या ठिकाणी आले. 

यावेळी वेळी संबंधित युवकांनी पवन वर बेछूट गोळीबार करत त्याची हत्या केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखत रातोरात घटनास्थळाचा पंचनामा करून शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला. बुधवारी सकाळी मृतदेहाची उत्तरीय तपासणी झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांसह समाज बांधवांनी आक्रमक पवित्रा घेतला. सर्वजण मोर्चाने कराड शहर पोलीस ठाण्यात दाखल झाले. यावेळी पवन चे नातलग व समाज बांधव महिला युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी संतप्त जमावाने पोलीस सहकार्यामुळेच पवनचा खून झाला असल्याचा गंभीर आरोप केला. 

या हल्ल्या प्रकरणातील आरोपींना सात करणारे हे कोण आहेत, त्यांना हल्लेखोरांना पैसा व शस्त्रे कोणी पुरवली,याचा पोलिसांनी शोध घ्यावा. या प्रकरणात दोषी असणार्‍या सर्व जणांना तात्काळ अटक करावी तसेच त्यांच्यावर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली. यासाठी जमावाने घोषणाबाजी करत जोरदार निदर्शने केली. सुमारे तासभर शहर पोलीस ठाण्याच्या आवारात ठीयाही मांडला. यावेळी वेळी कराड तालुक्याचे पोलीस उपाधीक्षक नवनाथ ढवळे यांनी अतिशय सक्षम पणे परिस्थिती हाताळत जमावाला शांत केले. पोलिसांनी कोणत्याही प्रकारचे आरोपींना अथवा अन्य कोणालाही गुन्ह्यासाठी सहकार्य केले नसल्याचे जमावाच्या निदर्शनास आणून दिले. या घटनेतील दोषींना अटक करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यासाठी पोलिसांना आवश्यक वेळ देणे जरुरीचे असल्याचे जमावाला पटवून दिले. 

त्यानंतर जमावाने मृतदेह ताब्यात घेण्यास संमती दर्शवली. अंत्यविधी करण्यासाठी कोल्हापूर कळंबा जेल मध्ये असलेल्या पवन याच्या भावाला आणण्यासाठी ठी यंत्रणा पाठविण्यात आली. याप्रकरणी प्रत्यक्षदर्शी च्या फिर्यादीवरून दहा ते बारा जणांवर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यापैकी चौघांची ओळख पटली असून उर्वरित लोक पुढच्या टप्प्यात ओळखली जातील असे पोलिस उपाधीक्षक नवनाथ ढवळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.