सातारा - महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पाल (ता. कराड) येथील खंडोबा यात्रा कोरोना संक्रमणामुळे सलग दुसऱ्या वर्षी रद्द करण्यात आली आहे. याबाबतचा आदेश प्रशासनाने जारी केले आहेत. असे असले तरी मार्तंड देवस्थानमार्फत भाविकांसाठी ऑनलाईन दर्शनासाठी ( online Martand Devsthan Darshan ) सोय करण्यात येणार आहे.
कोरोना संक्रमणामुळे यात्रा रद्दचा निर्णय-
पाल येथील खंडोबा यात्रा १५ जानेवारी रोजी प्रारंभ होणार होती. परंतु, ओमायक्रॉनचा वाढता प्रादुर्भाव आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी व संचारबंदी आदेशामुळे कराड प्रशासनाने श्री क्षेत्र खंडोबा यात्रा रद्द करण्याचा ( Corona impact on Pali Yatra ) निर्णय घेतला ( Palis Khandoba yatra cancelled ) आहे. गतवर्षीही कोरोनामुळे यात्रा भरवण्यात आली नव्हती. प्रांताधिकारी उत्तम दिघे यांनी आज (मंगळवारी) यात्रा रद्द केल्याचा आदेश ( Uttam Dighe order on Khandoba Yatra ) काढले आहेत.
हेही वाचा-शरद पवारांना मुख्यमंत्र्यांनी स्वतःचा चार्ज दिला आहे का? -राम कदम
मानकऱ्यांच्या उपस्थितीत होणार खंडोबा-म्हाळसाचा विवाह सोहळा...
यात्रा रद्द करण्यात आल्यामुळे १४ ते १९ जानेवारी आणि २३ जानेवारी रोजी देवस्थानचे मानकरी, ट्रस्टचे विश्वस्त सोडून परगावातील, जिल्ह्यातील अथवा इतर राज्यातील भाविकांना दर्शनास मनाई करण्यात आली आहे. धार्मिक विधी व खंडोबा-म्हाळसाचा लग्न सोहळा फक्त मानकरी आणि ट्रस्टचे विश्वस्त, अशा ५० लोकांमध्येच करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
पालसह पाच किलोमीटर परिसरात संचारबंदी...
पाल यात्रेच्या मुख्य दिवशी (दि. १५ जानेवारी) पाल गावासह आसपासच्या ५ किलोमीटर परिसरात दुपारी १२ ते सायंकाळी ७ पर्यंत संचारबंदी लागू असणार आहे. भाविकांना मंदिर परिसरात अथवा लग्न सोहळ्याच्या ठिकाणी येता येणार नाही. सासनकाठ्या, मानकरी, पालख्या, बैलगाड्या, दुकाने, स्टॉल, खेळण्यांच्या दुकानांनादेखील मनाई करण्यात आली आहे. देवस्थानमार्फत भाविकांसाठी ऑनलाईन दर्शनाची सोय केली जाणार आहे. यात्रा रद्द झाल्याने महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातून येणाऱ्या लाखो भाविक व मानकऱ्यांचा हिरमोड झाला आहे.
हेही वाचा-Corona Update : भारतात कोरोना रुग्णांमधे घट, 1.68 लाख नवीन रुग्णांची नोंद