ETV Bharat / state

कोरोना लसींबाबत उठलेल्या अफवांमुळे जिल्ह्यात एक हजार लाभार्थी लसीकरणापासून वंचित - सातारा कोरोना लसीकरण

कोरोना व्हायरसचा प्रतिबंध करण्यासाठी सुरु झालेल्या लसीकरण मोहिमेत जिल्ह्यात उद्दिष्टापेक्षा सुमारे एक हजार आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेतलेली नाही. या लसीबाबत समाजमाध्यमांतून पसरलेला गैरसमज हे त्याचे प्रमुख कारण सांगितले जाते. दरम्यान मी स्वत: ही लस घेतली असून ती पूर्णपणे सुरक्षित आहे, असा निर्वाळा जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिला आहे.

rumors about corona vaccine
rumors about corona vaccine
author img

By

Published : Feb 1, 2021, 3:14 PM IST

सातारा - कोरोना व्हायरसचा प्रतिबंध करण्यासाठी सुरु झालेल्या लसीकरण मोहिमेत जिल्ह्यात उद्दिष्टापेक्षा सुमारे एक हजार आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेतलेली नाही. या लसीबाबत समाजमाध्यमांतून पसरलेला गैरसमज हे त्याचे प्रमुख कारण सांगितले जाते. दरम्यान मी स्वत: ही लस घेतली असून ती पूर्णपणे सुरक्षित आहे, असा निर्वाळा जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिला आहे.

१९ केंद्रांवर लसीकरण -

सातारा जिल्ह्यासह देशभरात १६ जानेवारी रोजी कोरोना व्हायरस प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली. सुरुवातीला १०० लसींची ९ सेशन झाली. नंतर त्यात १९ पर्यंत वाढ करण्यात आली. आत्तापर्यंत ५ हजार ९०० लाभार्थ्यांना लसीकरण होणे अपेक्षित होते. मात्र त्यापैकी ४ हजार ८९१ लाभार्थ्यांनीच लसीकरण करुन घेतले. म्हणजे सुमारे एक हजार लाभार्थ्यांनी लसीकरणाकडे पाठ फिरवल्याचे स्पष्ट झाले आहे. काही लाभार्थ्यांना वेळेत मेसेज पोहचले नसल्याने ही तफावत असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जाते.

कोरोना लसींबाबत माहिती देताना आरोग्य अधिकारी
अनाठाई भिती -हे काही प्रमाणात मान्य केले तरी लसीकरणाबाबत गैरसमजातून निर्माण झालेली भिती हेही एक प्रबळ कारण असल्याची आरोग्य कर्मचाऱ्यात दबक्या आवाजात चर्चा आहे. सरकारी कर्मचारी असल्याने शासनाच्याच लसीकरणाच्या अनुषंगाने असलेल्या गैरसमजाबाबत थेट माध्यमांपुढे बोलण्यास कोणीही पुढे येत नाही. या प्रतिबंधक लसीमुळे हार्मोन्समध्ये बदल घडत असल्याची मोठी अफवा सरकारी आरोग्य यंत्रणेतील घटकांचे खासगी ग्रुप व काही समाजमाध्यमांवर पोस्टच्या माध्य़मातून फिरत आहे. लसीकरण सुरक्षित - सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेक लिमिटेडद्वारे विकसित आणि निर्मित केलेल्या दोन्ही लसी सुरक्षित आणि रोगप्रतिकारक असल्याचं देशातील राष्ट्रीय नियामक प्राधिकरणानं स्पष्ट केले आहे. १६ जानेवारीला कोरोना लसीकरणाच्या मोहिमेला सुरुवात झाल्यापासून समूह माध्यमांवर काही लोकांच्या मृत्यूबद्दल अनेक अफवा समोर आल्या आहेत. मात्र, हे मृत्यू लसीशी संबंधित असल्याचे आढळले नाही, असा खुलासा केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी एका पत्राद्वारे केला आहे.प्रशासनाचा निर्वाळा -या संदर्भात साताऱ्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध आठल्ये यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी लसीकरण‍ाच्या अनुषंगाने उठलेल्या अफवांचे खंडण केले. त्यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले, "मी स्वत: ही प्रतिबंधक लस घेतली आहे. आत्तापर्यंतच्या लाभार्थ्यांपैकी कोणालाही मेजर साईड इफेक्ट झालेला नाही. हे कोविशिल्ड व को-व्हॅक्सीन अत्यंत सुरक्षित आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.