सातारा - साताऱ्यात गोळ्या घालून एकाची हत्या करण्यात आली आहे. बॉम्बे रेस्टॉरंट चौकानजीकच्या नटराज मंदिराबाहेर ही घटना घडली आहे. दिवसाढवळ्या ही हत्या झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले ( One Shot Dead In Gun Firing Satara ) आहेत.
अर्जुन यादव (रा. वाई), असे खून झालेल्याचे नाव आहे. मागील वर्षी वाई एमआयडीसीत गोळीबार केल्याप्रकरणी वाई पोलीस ठाण्यात त्याच्यावर ३०७ अन्वये गुन्हा दाखल आहे. अर्जुन यादव याच्या हत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, पुर्ववैमनस्यातून ही घटना घडली असावी, असा पोलिसांना संशय आहे.