ETV Bharat / state

साताऱ्यात कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर एकाचा मृत्यू

संपत राजाराम जाधव असे 59 वर्षीय मृत व्यक्तीचे नाव आहे. या घटनेनंतर रेठरे ग्रामस्थांनी आरोग्य केंद्रातील डॉक्टरांना धारेवर धरले होते. त्यामुळे आरोग्य केंद्रात गोंधळ उडाल्याची स्थिती यानंतर निर्माण झाली होती.

साताऱ्यात कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर एकाचा मृत्यू
साताऱ्यात कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर एकाचा मृत्यू
author img

By

Published : Apr 17, 2021, 7:45 AM IST

सातारा : कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर काही वेळातच एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुकमध्ये शुक्रवारी दुपारी घडली आहे. संपत राजाराम जाधव असे 59 वर्षीय मृत व्यक्तीचे नाव आहे. या घटनेनंतर रेठरे ग्रामस्थांनी आरोग्य केंद्रातील डॉक्टरांना धारेवर धरले होते. त्यामुळे आरोग्य केंद्रात गोंधळ उडाल्याची स्थिती यानंतर निर्माण झाली होती.

लसीकरणानंतर जाधव यांना त्रास

याविषयी सविस्तर वृत्त असे की, रेठरे बुद्रुक येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शुक्रवारी लसीकरण सुरू होते. संपत जाधव हे दुपारी तीनच्या सुमारास लस घेऊन आरोग्य केंद्रातून बाहेर आले. यानंतर त्याच ठिकाणी ते चक्कर येऊन कोसळले. लसीकरणानंतर जाधव यांचा रक्तदाब वाढल्याने त्यांना रूग्णालयात घेऊन जात असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर रेठरे बुद्रुक प्राथमिक आरोग्य केंद्रात ग्रामस्थांनी काही वेळ गोंधळ घातला.

आधीपासूनच होता रक्तदाबाचा त्रास

संपत जाधव यांना आधीपासूनच रक्तदाबाचा त्रास होता. लस घेतल्यानंतर त्यांना चक्कर आली. यावेळी त्यांची तपासणी केली असता रक्तदाब खूप वाढला होता. त्यामुळे त्यांना कृष्णा रूग्णालयात नेण्यात आले, अशी माहिती रेठरे बुद्रुक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी ए. व्ही. कदम यांनी दिली.

उच्च रक्तदाबाने जाधव यांचा मृत्यू
संपत राजाराम जाधव यांचा मृत्यू ही लसीकरणानंतरची प्रतिकूल घटना आहे. लसीकरणानंतर त्यांचा उच्च रक्तदाब आणि अस्वस्थता नोंदविली गेली. त्यांना आणीबाणीची औषधे देऊन रुग्णालयात नेत असतानाच मृत्यू झाला. प्राथमिक अहवालात त्यांचा मृत्यू लसीकरणाशी संबंधित नसल्याचे नोंदविले गेले आहे. दरम्यान, संपत राजाराम जाधव यांचा मृत्यू उच्च रक्त दाबातून झाल्याचे साताऱ्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.