ETV Bharat / state

कोरोना संशयित नऊ महिन्यांच्या बालिकेचा मृत्यू ; अहवाल प्रलंबित

कराडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये श्वसन संस्थेच्या तीव्र जंतू संसर्गामुळे दाखल करण्यात आलेल्या नऊ महिन्यांच्या बालिकेचा विलगीकरण कक्षात मृत्यू झाला आहे.

satara corona news
कोरोना संशयित नऊ महिन्यांच्या बालिकेचा मृत्यू ; अहवाल प्रलंबित
author img

By

Published : Apr 4, 2020, 9:34 PM IST

सातारा : कराडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये श्वसन संस्थेच्या तीव्र जंतू संसर्गामुळे दाखल करण्यात आलेल्या नऊ महिन्यांच्या बालिकेचा विलगीकरण कक्षात मृत्यू झाला आहे.अद्याप तिचा कोरोना तपासणी अहवाल प्रलंबित आहे.

श्वसन संस्थेच्या तीव्र जंतुसंसर्गामुळे 24 वर्षाच्या व्यक्तीला आज क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तसेच कराडच्या कृष्णा हॉस्पिटल मध्ये बाधित रुग्णांच्या सहवासातील दोघांना दाखल करण्यात आले. याचसोबत श्वसन संस्थेचा तीव्र जंतुसंसर्गामुळे नऊ महिन्यांच्या बालिका देखील विलगीकरण कक्षात दाखल केले होते. या सर्व रुग्णांच्या घशातील स्त्राव पुण्याला तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. यापैकी नऊ महिन्यांच्या बालिकेचा मृत्यू झाल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.आमोद गडीकर यांनी सांगितले.
तसेच काल (3 एप्रिल) सातारा जिल्हा रुग्णालयात दाखल असणाऱ्या 4 अनुमानित व एका खासगी दवाखान्यात दाखल असणारा एक असे एकूण 5 रुग्णांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह असल्याची माहिती श्री.गडीकर यांनी दिली आहे.

आज सायंकाळपर्यंतची जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा

1. एकूण दाखल - 171
2. जिल्हा शासकीय रुग्णालय- 81
3. कृष्णा रुग्णालय, कराड- 88
4. खासगी रुग्णालय- 02
5. कोरोना नमुने घेतलेले- 171
6. कोरोना बाधित अहवाल - 03
7. कोरोना अबाधित अहवाल - 164
8. अहवाल प्रलंबित - 04
9. डिस्चार्ज दिलेले- 164
10. सद्यस्थितीत दाखल- 07
11. आलेली प्रवाशी संख्या - 644
12. होम क्वारान्टीनमध्ये असलेल्या व्यक्ती 644
13. पैकी 14 दिवस पूर्ण व्यक्ती - 463

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.