ETV Bharat / state

Protest against Bandatatya Karadkar in Karad : वादग्रस्त विधान केल्याने संताप... राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी बंडातात्यांच्या प्रतिमेला मारले जोडे

author img

By

Published : Feb 5, 2022, 4:33 PM IST

Updated : Feb 5, 2022, 4:47 PM IST

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बंडातात्या कराडकर यांच्या प्रकाश जंत्रे या मूळ नावाने ( Bandatatya original name Prakash Jantre ) निषेधाच्या घोषणा दिल्या आहेत. राष्ट्रवादीचे नेते नंदकुमार बटाणे ( Nandkumar Batane slammed Bandatatya Karadkar ) म्हणाले, की दीडशे वर्षाची पंरपरा असणार्‍या कराडकर मठात बंडातात्या लहानाचे मोठे झाले. मात्र, कराडकर मठातील संस्कार ते विसरले.

राष्ट्रवादीचे आंदोलन
राष्ट्रवादीचे आंदोलन

सातारा- राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बंडातात्या कराडकर यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला जोडे मारून ( NCP protest against Bandatatya Karadkar controversy ) निषेध केला. कराडकर यांनी आंदोलनावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांविरोधात वादग्रस्त वक्तव्य केले होते.

कराडमधील मठात बंडातात्या लहानाचे मोठे झाले. त्याच मठाच्या पायर्‍यांवर बंडातात्यांविरोधात राष्ट्रवादीने आंदोलन केले. त्यामुळे वारकरी सांप्रदायातील सेवेला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, बंडातात्यांच्या वक्तव्याचे राज्यभर तीव्र पडसाद उमटल्याने ते अडचणीत ( Reactions after Bandatatya Karadkars statement ) आले आहेत.

कराडकर मठातील संस्कार विसरले

हेही वाचा-Lata Mangeshkar health : लता मंगेशकर यांची प्रकृती खालावली, पुन्हा व्हेंटिलेटरवर

प्रतिकात्मक प्रतिमेला मारले जोडे
राष्ट्रवादी काँग्रेसचे कराड शहराध्यक्ष नंदकुमार बटाणे यांच्यासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बंडातात्या कराडकरांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला. बंडातात्यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला जोडे मारण्यात आले. बंडातात्यांचा निषेध असो, अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या. तसेच त्यांच्या प्रकाश जंत्रे या मूळ नावाने ( Bandatatya original name Prakash Jantre ) निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या आहेत. राष्ट्रवादीचे नेते नंदकुमार बटाणे ( Nandkumar Batane slammed Bandatatya Karadkar ) म्हणाले, की दीडशे वर्षाची पंरपरा असणार्‍या कराडकर मठात बंडातात्या लहानाचे मोठे झाले. मात्र, कराडकर मठातील संस्कार ते विसरले. वास्तविक त्यांनी सांप्रदायावर बोलायला हवे होते. परंतु, ते राजकीय नेत्यांवर बोलले. स्वत:ला प्रसिद्धी झोतात आणण्यासाठीच त्यांनी अशी वक्तव्ये केली आहेत, असा आरोप नंदकुमार बटाणे यांनी केला.

हेही वाचा-Jammu Kashmir Terrorist Encounter : श्रीनगरमध्ये पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, दोन दहशतवादी ठार

पालकमंत्र्यांचे बंडातात्यांना आव्हान...
कराडकर मठाचे ट्रस्टी आणि तत्कालिन मठाधिपती बाजीराव जगताप यांच्यातील वाद राज्यभर गाजला होता. मठाधिपतीपदावरून झालेल्या वादात मठाधिपतींच्या खुनाचाही प्रकार पंढरपुरात घडला होता. हा धागा पकडून पालकमंत्री तथा कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील ( MLA Balasaheb Patil challenges Bandatatya Karadkar ) यांनी कराडकर मठाचा प्रश्न सोडवून दाखवावा, असे आव्हान बंडातात्या कराडकरांना दिले आहे.

हेही वाचा-Bandatatya Karadkar Apology: वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या बंडातात्या कराडकरांचा माफीनामा... अटकेनंतर झाली सुटका

वादग्रस्त विधानानंतर माफी, अटक व सुटका-

राष्ट्रवादीच्या नेत्यांविरोधात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर ( Bandatatya Karadkar arrest by Satara Police ) यांना सातारा पोलिसांनी अटक केली होती. तत्पुर्वी बंडातात्यांनी आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली ( Bandatatya Karadkars apology ) होती. कराडकर यांची शुक्रवारी सुटका करण्यात आली आहे.

Last Updated : Feb 5, 2022, 4:47 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.